शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

पूर्व भागाची होरपळ सुरू!

By admin | Updated: March 23, 2015 00:44 IST

वातावरण निवळले : मार्चअखेरीस पारा जाणार ३९ अंशावर

प्रवीण जगताप - लिंगनूर -सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील वातावरण आता निवळले आहे. अवकाळी पावसाने गेल्या पंधरवड्यात सलग चारवेळा खेळ मांडला असताना, आता वातावरण पूर्वपदावर येऊ लागले आहे. अवकाळी ढग बाजूला जात असतानाच आता सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केली आहे. तापमानाचा पारा मार्चअखेरीस ३९ अंशापर्यंत वर सरकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या संकेतस्थळावरून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अवकाळीच्या धारांनंतर आता उन्हामुळे अंगाची लाही लाही होत घामाच्या धारा सुरू होणार, असे चित्र निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ व जत तालुका कोरडा समजला जातो. येथील उन्हाळा अधिक तीव्र होताना दरवर्षी अनुभवास येतो. अशातच मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चारवेळा अवकाळी पावसाने धिंगाणा घातल्याने, बिगरमोसमी वातावरणाचा अनुभव शेतकऱ्यांसह सर्वांनाच आला. या अवकाळीने सर्वच शेतीपिकांचे नुकसान केले. पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. तूर्तास अवकाळी ढग निवळत असताना, दुसरीकडे उन्हाळा मात्र अधिक प्रखर होऊ लागला असून तीन दिवसांपासून सकाळी ११ पासूनच उन्हाचे चटके सायंकाळी पाच वाजेपर्यंत सामान्य जनतेला, तसेच फळपिके व भागातील भाजीपाल्यालाही सोसावे लागत आहेत. आता अशातच जिल्ह्याच्या पूर्व भागात यंदा सारा शिवार गार करणाऱ्या ‘म्हैसाळ’ आवर्तनाच्या पाण्याचीही नुसती वाफच होते की काय, असे दाहक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा मार्चपासून म्हैसाळचे किमान आवर्तन सुरू होईपर्यंत ही उन्हाची दाहकता अधिकाधिक सोसत राहावी लागणार, हे निश्चित आहे.‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू न झाल्यास अगदी ३० मार्चपासून उन्हाचा पारा ३९ अंशापर्यंत पोहोचणार असल्याने, उरलेसुरले पाण्याचे स्रोत व साठेही संपणार आहेत. कूपनलिका व विहिरींचे पाणी पूर्ण संपण्याची भीती आहे. पुन्हा खरड छाटणीच्या स्थितीतील द्राक्षबागा, फळपिके, भाजीपाला यांची शेती पाण्याअभावी संकटात येऊ शक ते. (वार्ताहर)योजनेच्या पाण्याबाबतही चिंता यंदा सारा शिवार गार करणाऱ्या ‘म्हैसाळ’ आवर्तनाच्या पाण्याचीही नुसती वाफच होते की काय, असे दाहक चित्र निर्माण झाले आहे. चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. २३ मार्च : ३८ , २९ व ३० मार्च : ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे.