शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याला कमावलं; दिवाळीत गमावलं!

By admin | Updated: November 17, 2015 00:02 IST

शेतकऱ्यांचे नुकसान दर कोसळल्याने कोमेजला झेंडूचा लाल, पिवळा गोंडा

पुसेगाव : पिवळा गोंडा म्हणून शेतात डोलणाऱ्या झेंडूने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरावर यावर्षी दु:खाचे तोरण बांधले. दसऱ्याला भलताच भाव खाणारा झेंडू दिवाळीत अक्षरश: पायदळी गेला. दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडवलही वसूल न झाल्याने झेंडू उत्पादकांत चिंंतेचे वातावरण आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात काटेवाडी, पुसेगाव, बुध, वर्धनगड, पवारवाडी या भागांत झेंडूच्या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. दरवर्षी या पट्ट्यात झेंडूंची लागवड होतेच; पण यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना या लागवडीचा मोठा फटका बसला. इनिव्हा, मॅक्सिमा, इनिव्हा आॅरेंज, इनिव्हा यलो, टॉल आॅरेंज, भगवती या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. झेंडूचे पीक तीन महिन्यांत तयार होते. सामान्यत: दसरा-दिवाळीच्या तोंडावर तोड करता येईल, अशा बेताने लागवड करण्यात येते. यावर्षी दसऱ्याला समाधानकारक उत्पन्न मिळाले, तरीही दिवाळीत लक्ष्मीपूजनालाच लक्ष्मी शेतकऱ्यावर रुसली. वेगवेगळ्या कारणांनी झेंडूचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.झेंडूची तोड झाल्यानंतर तो विकायला बाजारपेठेत जाणे प्रत्येक शेतकऱ्याला जमते, असे नाही. अनेक शेतकरी आपला झेंडू शहरात पाठवून देतात. यावर्षी काहींनी आपला माल पुण्या-मुंबईच्या बाजारपेठेला पाठवून दिला. तर काहींनी जवळचा तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडू पाठविला. प्रवासात पोती एकावर एक रचल्याने फुले दबून नुकसान झाले. या फुलांना दर कमी मिळतो. दसऱ्याला पुणे मार्केटमध्ये शंभर रुपये किलोप्रमाणे विकणारा झेंडू दिवाळीत १५ ते २० रुपये किलोने विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. काही जणांनी आपल्याच शेताच्या कडेला बसून रस्त्यावर फुलांची विक्री सुरू केली होती. परंतु, त्यांनाही अत्यल्प मागणीमुळे नुकसान सोसावे लागले आहे. दिवाळीत ही पट्टी इतकी कमी झाली की अनेकांचा खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.काहीजणांना तर फुलांच्या किमतीपेक्षाही अधिक खर्च सांगितला गेला. काही वेळा व्यापारी विक्रीची खरी किंंमत शेतकऱ्यांना कळू देत नाहीत. त्यामुळे अंतिमत: शेतकऱ्यांचेच नुकसान होते. यावर्षी अनेकांना दिवाळीच्या वेळीची फुलाच्या विक्रीची पट्टी अनेक पटीने कमी आली आहे. काही शेतकऱ्यांना तर खर्चापोटी ‘पाचशे रुपये तुम्हीच आम्हाला पाठवून द्या,’ असा उलटा निरोप शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विवंचनेत भर पडली आहे. दसऱ्याला खुललेली झेंडूची कळी दिवाळीत कोमेजल्याने नुकसान झाले. (वार्ताहर)निर्सगाच्या लहरीपणाचा फटकाझेंडूच्या पिकांना यंदा निर्सगानेही दणका दिला. परतीच्या पावसाने वातावरण बदलून गेले. अशा बदलांमुळे झेंडूच्या झाडावर करपा पडतो. झाडाची पाने करपून वाढ खुंटते. यामुळेही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी मागणीपेक्षा पुरवठा खूपच अधिक झाल्याने अनेकांवर फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. दसऱ्याच्या सणाला जो दर झेंडूच्या फुलांना मिळाला, तसा दिवाळीला मिळाला असता तर काहीतरी पदरात पडले असते. निर्सगाची अवकृपा आणि व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे.-अक्षय गोरे, झेंडू उत्पादक शेतकरी पुसेगावअसा आहे लागवडीचा खर्च...एका एकरात झेंडूच्या ८ हजार झाडांची लागवडएका रोपांची किंमत १.७० ते १.९० रुपये एकरी २० हजार रुपये रोपांवर खर्च भर घालणे, भांगलणे अशा कामांसाठी मजुरीवर एकरी १० हजार खर्ची औषध फवारणीचा खर्च सुमारे ८ हजार रुपये तोडणी, वाहतूक अशा आनुषंगिक बाबीवर सुमारे १० हजार रुपये खर्च अपेक्षित झेंडू ज्या बारदाण्यातून बाजारात नेला जातो, त्याची किंंमत प्रत्येकी १२ रुपये ते १५ रुपये एवढे करून मिळालेल्या दरातून हमाली, तोलाई