शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चारुतासागर शासनदरबारी अजूनही उपेक्षितच : साहित्यरसिकांतून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:03 IST

तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव येथे साहित्यसंमेलने दररवर्षी होतात. परंतु या संमेलनातूनही आजपर्यंत ठोसपणे चारुतासागर यांच्या स्मारकाची मागणी झालेली नाही किंवा तालुक्यातील साहित्यिकही या मागणीसाठी पुढे आले नाहीत. मळणगाव येथील चारुतासागर फौंडेशनच्यावतीने गावात त्यांच्या नावे अलीकडे साहित्य संमेलन भरवले जात आहे.

ठळक मुद्दे स्मारकाची मागणी दुर्लक्षित; कवठेमहांकाळची साहित्य संमेलनेही अर्थसाहाय्याविना

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : कसदार लेखणीने अभिजात साहित्याची निर्मिती करणारे ग्रामीण कथाकार चारुतासागर ऊर्फ दिनकर दत्तात्रय भोसले शासनदरबारी अजूनही उपेक्षितच आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी साहित्यरसिक करत आहेत.

चारुतासागर कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगावचे. त्यांच्यामुळे हे गाव, तालुका मराठी साहित्य क्षेत्राच्या पटलावर माहीत झाला. चारुतासागर यांनी मामाचा वाडा, नागीण, नदीपार असे दमदार कथासंग्रह लिहिले. त्यांच्या दर्शन या कथेवर ‘जोगवा’ हा मराठी चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांनी स्त्रीजीवन, समाजातील उपेक्षित, वंचित, पीडित घटक यांचे सत्यकथन साहित्यातून मांडले. परंतु या साहित्यिकाच्या पदरी जिवंतपणीही आणि मरणोत्तरही उपेक्षाच आली आहे. त्यांना जाऊन दशक पूर्ण होत आले. परंतु त्यांच्या गावात, तालुक्यात त्यांचे साधे स्मारकही नाही. गावात त्यांच्या स्मारकाला जागा दिली आहे, परंतु ती गावाच्या बाहेर आहे.

तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव येथे साहित्यसंमेलने दररवर्षी होतात. परंतु या संमेलनातूनही आजपर्यंत ठोसपणे चारुतासागर यांच्या स्मारकाची मागणी झालेली नाही किंवा तालुक्यातील साहित्यिकही या मागणीसाठी पुढे आले नाहीत.मळणगाव येथील चारुतासागर फौंडेशनच्यावतीने गावात त्यांच्या नावे अलीकडे साहित्य संमेलन भरवले जात आहे. परंतु या संमेलनालाही तालुक्यातून पुरेसे अर्थसाहाय्य व प्रतिसाद मिळत नाही. ज्येष्ठ समीक्षक जी. के. ऐनापुरे यांनी मात्र ‘चारुतासागर : एक दु:खाचा गिरव’ हे समीक्षापुस्तक लिहून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चारुतासागर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता; मात्र त्यांच्या निधनानंतर त्यादिशेने लोकप्रतिनिधींची पावले पडताना दिसून येत नाहीत. मराठी साहित्य शिवारात अभिजात लेखणीने ग्रामीण जीवनाच्या वास्तवाची कथारूपी बीजे पेरणाऱ्या चारुतासागर यांना त्यांच्या पश्चात तरी न्याय मिळणार का, त्यांचे स्मारक होणार का, की या ‘जोगवा’काराच्या पदरात उपेक्षाचा जोगवाच पडणार, अशी भावना व्यक्त होत आहे.

चारुतासागर मराठी साहित्य क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांचे कवठेमहांकाळ या तालुक्याच्या ठिकाणी स्मारक होणे गरजेचे आहे. त्यामध्ये वाचनालय, गं्रथालय असणे आवश्यक असून, यासाठी जिल्ह्यातील साहित्यिकांनी पुढे येण्याची गरज आहे.-प्रा. जी. के. ऐनापुरे, ज्येष्ठ समीक्षक

टॅग्स :Sangliसांगली