शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कोरोना काळात राज्यातील अपघात २४ टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

अविनाश कोळी सांगली : कोरोना काळात अनेक महिन्यांचा लॉकडाऊन व त्यामुळे घटलेली रस्त्यावरील वाहनांची संख्या अपघाताचा आलेख कमी करण्यास ...

अविनाश कोळी

सांगली : कोरोना काळात अनेक महिन्यांचा लॉकडाऊन व त्यामुळे घटलेली रस्त्यावरील वाहनांची संख्या अपघाताचा आलेख कमी करण्यास कारणीभूत ठरली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण तब्बल २४ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर राज्यात अपघाती मृत्युदराची सर्वाधिक घट सिंधूदुर्ग, औरंगाबाद शहर व पुणे शहरात नोंदली गेली आहे.

राज्यातील अपघाताची संख्या व त्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे २०१८ ते २०२० या काळातील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटत होते; मात्र कोरोना काळात मोठा लॉकडाऊन लागल्याने राज्यातील अपघातांच्या प्रमाणात अभूतपूर्व घट नोंदली गेली. रस्त्यावरील वाहनांची संख्याच कमी झाल्याने हा चांगला परिणाम दिसत आहे. मात्र, अनलॉॅक काळात पुन्हा अपघात वाढल्याचे निरीक्षणही महामार्ग पोलिसांनी नोंदविली आहे.

चौकट -

चार जिल्ह्यात ३० टक्के अपघात

पुणे, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या चार जिल्ह्यांतील अपघातांची संख्या राज्यातील एकूण अपघातात ३० टक्के इतकी आहे. दुसरीकडे २०२० मध्ये झालेल्या एकूण अपघाती मृत्यूमध्ये २६ टक्के म्हणजेच एकूण ३ हजार ३६ मृत्यू नाशिक ग्रामीण (८०१) , पुणे ग्रामीण (६९६), अहमदनगर (६४२), जळगाव (४७२), सोलापूर ग्रामीण (४२५) या भागात नोंदले गेले.

चौकट

राज्यातील अपघाताचे प्रमाण असे घटले

प्रकार २०१९ २०२० घट टक्के

एकूण अपघात ३२,९२५ २४९७१ २४

मृत्यू १२७८८ ११५६९ १०

गंभीर अपघात १२१९७ ९०९४ २५

किरकोळ दुखापत ५४७३ ३४३२ ३७

चौकट

या विभागात अपघाती मृत्युदरात सर्वाधिक घट

जिल्हा घट टक्के

सिंधूदुर्ग ३३

औरंगाबाद शहर ३२

पुणे शहर ३१

चौकट

अनलॉक काळात घात

लॉकडाऊनमध्ये अपघातांच्या प्रमाणात मोठी घट झालेली असताना अनलॉक काळात मात्र अपघातांचे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसत आहे. डिसेंबर २०२० या एकाच महिन्यात राज्यात ३०७२ अपघात व १ हजार ४६२ मृत्यू नोंदले गेले. याउलट एप्रिल २०२० या महिन्यात सर्वांत कमी ५७२ अपघात व ३०३ मृत्यू नोंदले गेेले.