शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा, मिरज, कडेगाव तालुक्यांमुळे संपूर्ण सांगली जिल्हा वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:24 IST

CoronaVIrus Sangli : वाळवा, मिरज आणि कडेगाव तालुक्यांच्या कोरोनाविषयक बेफिकीरीमुळे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली येण्यास तयार नाही. तीन तालुक्यांमुळे संपूर्ण जिल्हा वेठीस धरला गेला आहे. तेथील दररोज वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्याला घोर लावला आहे.

ठळक मुद्देवाळवा, मिरज, कडेगाव तालुक्यांमुळे संपूर्ण सांगली जिल्हा वेठीससांगली, मिरजेला जमते, वाळव्याला का नाही?

संतोष भिसे

सांगली : वाळवा, मिरज आणि कडेगाव तालुक्यांच्या कोरोनाविषयक बेफिकीरीमुळे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली येण्यास तयार नाही. तीन तालुक्यांमुळे संपूर्ण जिल्हा वेठीस धरला गेला आहे. तेथील दररोज वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्याला घोर लावला आहे.पॉझिटीव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी येताच व्यवहार खुले करण्याची ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे, पण खुद्द पालकमंत्र्यांचाच मतदारसंघ नियंत्रणाबाहेर गेला आहे. वाळवा तालुक्याचा पॉझिटीव्हीटी दर १३ टक्के आहे. तो कमी करण्यासाठी निर्बंध कडक करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही वाळव्याला कोरोना नियंत्रणात यश आलेले नाही.तालुक्यात सध्या १ हजार ७४९ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचे तब्बल ३२ हॉटस्पॉट आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. मिरज व कडेगाव तालुक्यांतही दररोजची वाढीव रुग्णसंख्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट वाढवत आहे. सर्वाधिक मृत्यूदेखील वाळवा (४१८) आणि मिरज (४२९) तालुक्यांतच झाले आहेत. यंत्रणा व लोकांची बेफिकिरी लॉकडाऊन वाढवणारी ठरत आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनीही दोन दिवसांपूर्वी वाळव्यात कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या गावांना भेटी देऊन कडक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रामाणिक अंमलबजावणी झाल्यास कोरोना नियंत्रणात येण्यास वेळ लागणार नाही.सांगली, मिरजेला जमते, वाळव्याला का नाही?सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्राची लोकसंख्या साडेसहा लाखांवर असताना येथील दररोजची रुग्णसंख्या सरासरी १२० आहे. शहरी भाग असूनही स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. मग वाळव्यासारख्या ग्रामिण भागाला नियंत्रण का शक्य होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिरज व कडेगाव तालुक्यांच्या दररोजच्या रुग्णसंख्येनेही जिल्ह्याला घोर लावला आहे.तुलनात्मक कोरोनाचा फैलाव असा

  • महापालिका क्षेत्र लोकसंख्या ७ लाख - दैनंदिन सरासरी रुग्ण १२० (०.०१ टक्के)
  • वाळवा तालुका लोकसंख्या ४ लाख ५६ हजार, दैनंदिन सरासरी रुग्ण २२५ (०.०५ टक्के)
  • मिरज तालुका लोकसंख्या ३ लाख ५१ हजार, दैनंदिन सरासरी रुग्ण ११० (०.०३ टक्के)
  • कडेगाव तालुका लोकसंख्या १ लाख ४३ हजार, दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या ९५ ( ०.०६ टक्के)

महापालिका क्षेत्र स्वतंत्र गृहीत धरुन संपूर्ण व्यवहार त्वरीत खुले केले पाहिजेत. अन्य तालुक्यांतील वाढती रुग्णसंख्या सांगली-मिरजेला रेड झोनमध्ये नेणारी ठरत आहे. महापालिका क्षेत्रातील दररोजची रुग्णसंख्या अत्यल्प असतानाही निर्बंध कायम ठेवणे योग्य नाही.- समीर शहा,व्यापारी एकता असोसिेशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली