शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: द्राक्ष, बेदाणा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मिळाली हक्काची बाजारपेठ - विवेक कुंभार 

By अशोक डोंबाळे | Updated: March 7, 2024 18:52 IST

सांगली : द्राक्ष व बेदाणा महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. येत्या काळात जिल्ह्यात सर्वात ...

सांगली : द्राक्ष व बेदाणा महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. येत्या काळात जिल्ह्यात सर्वात मोठा द्राक्ष महोत्सव साजरा करूया, अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.सांगली येथील कच्छी जैन भवनमध्ये कृषी विभाग, द्राक्ष संघ, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, बेदाणा व्यापारी असोसिएशन व बाजार समितीतर्फे महाशिवरात्री द्राक्ष दिनानिमित्ताने द्राक्ष व बेदाणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी कृषी उपसंचालिका प्रियंका भोसले, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी धनाजी पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी स्वप्निल माने, द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष संजय बरगाले, विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, यांच्यासह बेदाणा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.विवेक कुंभार म्हणाले, शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ केली आहे. ग्राहकांना द्राक्षाचे महत्त्व सांगणे अपरिहार्य आहे. त्यासाठी द्राक्ष संघ द्राक्ष उत्पादक शेतकरी यांनी पुढाकार घेतला पाहिजे.संजय बरगाले म्हणाले, या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी महाशिवरात्री द्राक्ष दिन दिनानिमित्त हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.ब्लॅक क्वीन बेरीचे आकर्षणद्राक्ष व बेदाणा महोत्सवात ब्लॅक क्वीन बेरी, फ्लेम सिडलेस, आरके, ज्योती सिडलेस, थॉमसन, आरा ३५, एसएसएन, सुपर सोनाका, विविध वाणांची द्राक्ष विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती.

टॅग्स :Sangliसांगली