शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्यामुळे जत तालुक्यात दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:40 IST

जत तालुक्यात अवकाळी पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून गाळमिश्रित, हिरवट रंगाच्या, शेवाळलेल्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्यामुळे जत तालुक्यात दूषित पाणीपुरवठापाणी शुद्ध करण्याची टीसीएल पावडरच निकृष्ट

गजानन पाटील संख : जत तालुक्यात अवकाळी पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून गाळमिश्रित, हिरवट रंगाच्या, शेवाळलेल्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी तालुक्यातील २८ गावांत पाणी नमुने दूषित असल्याचे आढळले आहे. टीसीएलमध्ये क्लोरीनचे प्रमाण २० टक्क्यांहूनही कमी आढळले आहे. निर्जंतुकीकरणाची टीसीएल पावडर निकृष्ट प्रतीची आढळून आली आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या टीसीएल नमुन्याची तपासणी घेतली जाते. त्यामध्ये तालुक्यातील २८ गावांत नमुने दूषित आढळले आहेत. यात तालुक्यातील बेवनूर, गुळवंची, दरीबडची, अंकलगी, मोरबगी, दरीकोणूर, बालगाव, खंडनाळ, लोहगाव, खोजानवाडी, हळ्ळी, सुसलाद, लमाणतांडा (उटगी), बेळोंडगी, उंटवाडी, उमराणी, आवंढी, शेगाव, येळदरी, गुगवाड, सोरडी, खैराव आदी गावांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. निगडी बुद्रुक, हळ्ळी, उटगी, सोनलगी व उमदी या ठिकाणी पाणी शुद्ध करण्याची टीसीएल पावडरच निकृष्ट आढळली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणSangliसांगली