शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:14 IST

सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात भरत गणपती बुरुड (वय ५२, रा. पंचशीलनगर, सांगली) या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बुरुड यांचा बळी गेल्याचा आरोप करुन त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गोंधळ घातला. डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिल्याने तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देनातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ : हलगर्जीपणाचा आरोपमृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय; पोलिस बंदोबस्त तैनातडॉक्टरवर कारवाईची मागणी

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात भरत गणपती बुरुड (वय ५२, रा. पंचशीलनगर, सांगली) या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बुरुड यांचा बळी गेल्याचा आरोप करुन त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गोंधळ घातला. डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिल्याने तणाव निर्माण झाला होता.भरत बुरुड यांच्या छातीत दुखू लागल्याने नातेवाईकांंनी त्यांना दुपारी साडेबारा वाजता उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. आकस्मिक दुर्घटना विभागात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना वॉर्ड क्रमांक ६२ मध्ये हलविण्यात आले. पण या वॉर्डात त्यांच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. इंजेक्शन, सलाईन तसेच साधी गोळीही दिली नाही. नातेवाईकांनी उपचार कधी सुरु करताय? अशी डॉक्टरांकडे विचारणा केली.

डॉक्टरांनी ईसीजीचा अहवाल आल्यानंतरच उपचार सुरु करावे लागतील, असे सांगितले. बुरुड यांच्या छातीतील वेदना वाढल्यानंतर नातेवाईकांनी परिचारिकांकडे इंजेक्शन देण्याची मागणी केली. तरीही परिचारिकांनी काहीच केले नाही. आम्ही अजून जेवणार आहोत, जेवण केल्यानंतर बघू, असे उत्तर देऊन दुर्लक्ष केले, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

तब्बल दोन तास उपचाराअभावी बुरुड तडफडत होते. अखेर अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. कोणतेही उपचार न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी वॉर्डातच गोंधळ घातला. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा त्यांनी इशारा दिला. त्यामुळे मृतदेह वॉर्डातच होता. रुग्णालय प्रशासनाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते.

प्रशासने यासंदर्भात विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे नातेवाईक अधिकच भडकले. उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच बुरुड यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार सायंकाळी रुग्णालयात मोठ्या संख्येने जमा झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रुग्णालयाच्या आवारात बंदोबस्त तैनात केला होता.डॉक्टरवर कारवाईची मागणीबुरुड यांच्यावर काहीच उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वॉर्डातील डॉक्टर, तसेच पारिचारिका यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. तसेच डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही व गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला.

रात्री उशिरापर्यंत त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आले नव्हते. त्यामुळे बुरुड यांचा मृतदेह वॉर्डातच होता. तसेच नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात तळ ठोकून बसले होते.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल