शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पूरपरिस्थितीमुळे बंद पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:42 IST

सांगली जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. आता या सर्व 98 पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी पलूस तालुक्यात एका गावात 1 टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देपूरपरिस्थितीमुळे बंद पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरूपूरबाधितांना 64 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत

सांगली : जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. आता या सर्व 98 पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी पलूस तालुक्यात एका गावात 1 टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.64 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीतसांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी दिनांक 5 सप्टेंबर अखेर ग्रामीण भागातील 43 हजार 492 व शहरी भागातील 40 हजार 678 कुटूंबांना एकूण 42 कोटी 8 लाख 50 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील 36 हजार 125 व शहरी भागातील 4490 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 22 कोटी 55 लाख 25 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटपाचे काम सर्व गावांत युध्दपातळीवर सुरू आहे.पूरबाधित 80 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटपदिनांक 5 सप्टेंबर अखेर 80 हजार 257 कुटुंबांना एकूण 8025.7 क्विंटल गहू व 8025.7 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 63 हजार 290 इतक्या बाधित कुटुबांना 5 लिटर प्रमाणे 3 लाख 16 हजार 450 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.28 हजार 106 घरांची पडझडपूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 9 हजार 393 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 18 हजार 713 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 1929 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू आहेत.50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामापुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 99 हजार 698 शेतकऱ्यांच्या 50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.वाणिज्य मिळकतीचे पंचनामे पूर्णपूरग्रस्त बाधित वाणिज्य मिळकतीच्या नुकसान झालेल्या बाधित गावांची संख्या 88 असून बाधित मिळकतीची संख्या 16 हजार 694 आहे. या सर्व मिळकतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 383 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 9 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे.

नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 44 लाख 52 हजार 400 इतकी आहे. जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 21 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 308 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 51.19 कोटी इतका आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली