शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाला गांभीर्याने तोंड द्या!

By admin | Updated: November 6, 2015 23:37 IST

जयंत पाटील : इस्लामपुरात समन्वय-पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

इस्लामपूर : तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे़ टंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे़ शासनाने घोषित केलेल्या १३ गावांना विविध योजना मिळवून देण्याबरोबरच तालुक्यातील पिण्याचे व शेतीचे पाणी, चारा आदीचे योग्य नियोजन करावे लागेल़ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. लोकांना टंचाईची झळ बसू नये यासाठी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा, अशी सूचना आमदार शिवाजीराव नाईक यांनी केली़ इस्लामपूर येथील तहसील कार्यालयामध्ये तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य सभापती रवींद्र बर्डे, अभिजित पाटील, गौरव नायकवडी, वीर कुदळे, उत्तम वायदंडे, अंकुश पाटील, तुकाराम पाटील, सौ़ प्रियांका सावंत, सौ़ वर्षाराणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीची बैठक झाली़ तहसीलदार सौ़ रूपाली सरनोबत यांनी स्वागत केले़ आ़ पाटील म्हणाले, तालुक्यातील २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवू शकते. त्यासाठी पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्यावर भर द्या. तालुक्यातील दुधारी, बावची, येडेमच्छिंद्र तलावातील गाळ काढावा लागेल़ याप्रसंगी रवींद्र बर्डे, अभिजित पाटील, गौरव नायकवडी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या़ गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, महावितरणचे अभियंता उस्मान शेख, वाय़ एऩ पठाण, पाटबंधारेचे उपअभियंता राजेंद्र कांबळे, भूमी अधीक्षक श्रीमती सुवर्णा मसणे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ़ ए़ एम़ सुतार, पशुवैद्यकीय अधिकारी शाम पाटील यांनी खात्याचा आढावा मांडला. मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपअभियंता रामचंद्र चव्हाण, बांधकाम उपअभियंता बी़ एल. हजारे आदी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर नायब तहसीलदार डॉ़ सौ़ शैलजा पाटील यांनी आभार मानले़ (वार्ताहर) अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी आ़ जयंत पाटील, आ़ शिवाजीराव नाईक यांनी दोघांमध्ये समन्वय राखत दोन तास विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला़ याप्रसंगी काही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली़ आ. पाटील म्हणाले की, आमच्या काळात मटका बंद होता़ मात्र आता जोरात सुरू आहे़ पोलीस खात्याने कडक पावले उचलावीत़ दर तीन महिन्यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन तालुक्यात झालेली कामे, कामातील अडचणींचा आढावा घेऊ.