शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भर, चारा छावणीचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:40 IST

लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथमप्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळी भागातून चारा छावणीचे प्रस्ताव आले, तर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देदुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भरसकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन

सांगली : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळी भागातून चारा छावणीचे प्रस्ताव आले, तर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सध्या तरी आपल्या अजेंड्यावर दोन विषय असल्याचे आवर्जून सांगितले होते. त्यात निवडणूक व जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिनाभराच्या कालावधीनंतर मंगळवारी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. आता २३ मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. या कालावधित प्रशासनातर्फे दुष्काळी उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.शासकीय आकडेवारीनुसार सध्या दोनशेहून अधिक ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तर साडेआठशेहून अधिक वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन पाणी योजनांची आवर्तने सुरू असल्याने या योजनांचा लाभ मिळणाऱ्या भागातील टंचाई आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे. याउलट जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह इतर तालुक्यातील पाणी न पोहोचलेल्या भागात मात्र, उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई वाढतच आहे.

यावर उपाययोजना म्हणून पाण्याचे टॅँकर मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वी थेट जिल्हाधिकाऱ्यांना होते. मात्र, आता प्रांताधिकारी, तहसील पातळीवरच टॅँकरना मंजुरी मिळत आहे. त्यामुळे कमी कालावधित टॅँकरची मागणी पूर्ण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आता दुष्काळी उपाययोजनांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली