शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य स्पर्धेमुळे कलाकाराला बळ

By admin | Updated: November 18, 2015 00:14 IST

अरुण नाईक : सांगलीत विभागीय स्पर्धेस प्रारंभ

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना कला सादर करून उमलण्याची संधी मिळते. अशा स्पर्धा वारंवार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अरुण नाईक यांनी येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस मंगळवारी प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते. ते म्हणाले की, सांगलीचा नाट्यपंढरी म्हणून राज्यभर नावलौकिक असल्यामुळे अनेक हौशी नाट्य स्पर्धांमध्ये येथील कलाकार उतरतात. शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेचे व्यासपीठ म्हणजे कलाकाराला भूमिकेतून उमलण्याची चांगली संधीच आहे. या स्पर्धेतून अनेक दिग्गज नाट्य कलाकार तयार झाले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धा सुरू ठेवण्याची गरज आहे. कलारसिकांनीही या स्पर्धांना हजेरी लावल्यास कलाकारांना उर्जा मिळेल.निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी म्हणाले की, नाट्य कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. यामध्ये आमच्याकडून काही उणिवा राहिल्यास कलाकारांनी तात्काळ संपर्क साधावा.बसवेश्वर घोडके (नांदेड), चंद्रकांत अत्रे (जळगाव) आणि गजानन कराळे (कल्याण) नाट्य स्पर्धेचे परीक्षक आहेत. सांगली केंद्राचे समन्वयक श्रीनिवास जरंडीकर यांनी प्रास्ताविक केले. शशांक लिमये यांनी आभार मानले. यावेळी शफी नायकवडी, श्रीनिवास शिंदगी, विजय कडणे यांच्यासह नाट्य कलाकार उपस्थित होते. राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकाने झाला. सातारा येथील थिएटर वर्कशॉप नाट्य संस्थेने हे नाटक सादर केले. रा. रं. बोराडे यांच्या कादंबरीवर हे नाटक आधारित असून, श्रीनिवास जोशी यांनी नाट्य रूपांतर केले आहे. रवींद्र डांगे दिग्दर्शक आहेत. चित्रा भिसे, गंगाधर पेटकर, गणेश धावडे, पुष्पा कदम यांच्यासह दहा कलावंतांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)