शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील युवक नशिल्या पानाच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:28 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि उपनगरांतील पानपट्टी चालकांनी आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी अनोखा फंडा अवलंबला आहे. पानामधून नशा येणारी पावडर घालून त्याची विक्री खुलेआम सुरु आहे. गुटख्यापेक्षाही यातून नशा अधिक येत असल्याने युवक वर्ग याकडे आकर्षित झाला आहे. या नशिल्या पावडर पानासाठी २५ ते ३० रुपयांची आकारणी ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि उपनगरांतील पानपट्टी चालकांनी आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी अनोखा फंडा अवलंबला आहे. पानामधून नशा येणारी पावडर घालून त्याची विक्री खुलेआम सुरु आहे. गुटख्यापेक्षाही यातून नशा अधिक येत असल्याने युवक वर्ग याकडे आकर्षित झाला आहे. या नशिल्या पावडर पानासाठी २५ ते ३० रुपयांची आकारणी केली जात आहे.युवावर्ग पूर्वीपासूनच गुटखा, मावा याच्या आहारी गेला आहे. शासनाने यावर बंदी आणली असतानाही चोरून गुटख्याची विक्री सुरुच आहे. या नशेला पर्याय म्हणून पानपट्टी चालकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. गुटखा, माव्यापेक्षा जास्त नशा येत असलेले पावडर पान विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या पानामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर टाकून त्याची विक्री केली जाते. या पानाची किंमत २५ ते ३० रुपयांपर्यंत आहे. याकडे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये मंदिरांलगत असलेल्या पानपट्ट्यांमध्ये सर्रासपणे मावा, गुटख्यासोबतच या पावडर पानाची विक्रीही जोमात सुरु आहे. हे पान रंगत नाही, परंतु त्याने नशा मात्र चांगली होते. हे पान चघळतच फाळकूटदादा, रोडरोमिओ, महाविद्यालयीन युवक मुली, महिलांची छेड काढताना दिसतात. या पानाच्या नशेमुळे चांगल्या घरातील युवक गुन्हेगारीकडे वळण्याचाही धोका निर्माण झाला आहे.पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षयापूर्वी ‘लोकमत’ने शहरातील मंदिरांनजीक असलेल्या पानपट्ट्या हलविण्यासंदर्भात वृत्त प्रसिध्द केले होते. परंतु याकडे पालिका प्रशासन व पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे पानपट्टीवाले चांगलेच शिरजोर झाले आहेत. शहरात जवळजवळ २ हजारहून अधिक पानटपºया आहेत. यामध्ये बोटावर मोजण्याइतपतच व्यावसायिक योग्यप्रकारे आपला व्यवसाय करतात. उर्वरित ९० टक्के पानपट्ट्यांमधून पावडर पान, गुटखा, मावा, तसेच इतर नशेचे साहित्य विक्री केले जाते. याची माहिती पोलिसांनाही मिळालेली आहे. परंतु याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले आहे.