शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जन्मतारखेच्या फरकाने अनेक रिक्षाचालकांचे मदतीचे अर्ज फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:50 IST

CoronaVirus Sangli : आधार कार्ड आणि परवान्यावरील जन्मतारखा जुळत नसल्याचे कारण देत अनेक रिक्षाचालकांचे मदतीसाठीचे अर्ज आरटीओ विभागाकडून फेटाळले जात आहेत. तद्दन सरकारी कार्यपद्धतीमुळे गरीब रिक्षाचालकांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. वरिष्ठांनी यात लक्ष घालून मदत मिळवून देण्याची मागणी चालकांनी केली आहे.

ठळक मुद्देजन्मतारखेच्या फरकाने अनेक रिक्षाचालकांचे मदतीचे अर्ज फेटाळले सरकारी कार्यपद्धतीमुळे गरीब रिक्षाचालक मदतीपासून वंचित

सांगली : आधार कार्ड आणि परवान्यावरील जन्मतारखा जुळत नसल्याचे कारण देत अनेक रिक्षाचालकांचे मदतीसाठीचे अर्ज आरटीओ विभागाकडून फेटाळले जात आहेत. तद्दन सरकारी कार्यपद्धतीमुळे गरीब रिक्षाचालकांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. वरिष्ठांनी यात लक्ष घालून मदत मिळवून देण्याची मागणी चालकांनी केली आहे.लॉकडाऊन काळात मदत म्हणून रिक्षाचालकांना शासनाकडून १५०० रुपयांची मदत दिली जात आहे. इतक्या अल्प मदतीने रिक्षाचालकांचे घर चालणारे नाही, पण काहीही नसल्यापेक्षा बरे म्हणून पैसे मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ सुरु आहे. यासाठी शासनाने पोर्टल सुरु केले असून त्यावर परवानाधारकांचा तपशील नोंदवला आहे. रिक्षाचालकांनी आपला आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक व रिक्षा क्रमांक त्यावर नोंदवायचा आहे. सरकारी माहिती आणि रिक्षाचालकाची माहिती जुळली की तो मदतीसाठी पात्र ठरतो.पण येथेच घोडे पेंड खाऊ लागले आहे. अनेक रिक्षाचालकांच्या परवान्यावरील व आधारकार्डवरील जन्मतारीख वेगवेगळी आहे. बहुतांश आधारकार्डवर जन्मतारीख अपूर्ण असून फक्त वर्ष नोंद आहे. यामुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत. शुक्रवारपासून (दि.२८) आरटीओ विभागाने रिक्षाचालकांच्या अर्जांची छाननी सुरु केली, तेव्हापासून अनेकांना अर्ज फेटाळल्याचा मेसेज मिळाला आहे.पोटावर पाय देऊ नकातांत्रिक दोष काढून गरीब रिक्षाचालकांच्या पोटावर पाय. देऊ नका अशी विनंती रिक्षाचालकांनी केली आहे. दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सरकारने मदतीची प्रक्रिया सुरु केली आहे. दिड हजारांची रक्कम अत्यल्प असली तरी त्याच आशेवर रिक्षाचालक दिवस काढत आहेत. प्रशासनाने तांत्रिक दोषाचा बाऊ न करता मार्ग काढावा अशी विनंती रिक्षाचालकांनी केली आहे.

रिक्षा चालकांंना मदतीसाठी रिक्षा क्रमांक व परवाना क्रमांक यांची खात्री अधिकाऱ्यांनी करावी. त्याचा तपशील आरटीओ कार्यालयात आहेच. नसल्यास रिक्षाचालक देण्यास तयार आहेत. संगणकीय पोर्टलमध्ये दोष स्वीकारला जात नसेल तर अधिकाऱ्यांनी मानवीय भूमिकेतून मार्ग काढून रिक्षाचालकांना मदत मिळवून द्यावी.- महेश चौगुले,सांगली जिल्हा रिक्षा बचाव कृती समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी