शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा तालुक्यात ६७.४६ टक्के

By admin | Updated: February 21, 2017 23:46 IST

चुरशीने मतदान : किरकोळ वाद वगळता शांततेत प्रक्रिया; अनेक ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रांवरील परस्परविरोधी कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची वगळता, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणुकीसाठी एकूण २ लाख ७२ हजार ८९0 इतके मतदार होते. त्यापैकी ६७.४६ टक्के मतदारांनी आपला मताचा हक्क बजाविला. एकूण १ लाख ८४ हजार ८० मतदारांनी मतदान केले.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समिती गणाच्या २२ जागा आहेत. त्यासाठी ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारी सकाळी ७.३0 वाजता तालुक्यातील ३0१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. दिवसभरात चिकुर्डे येथील आश्रमशाळेतील अपवाद वगळता एकाही मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड न होता मतदान यंत्रांवरील ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. चिकुर्डे येथील मतदान यंत्र सकाळी ७.३0 ते ८ या कालावधित बंद होते. तेथे नवीन यंत्र बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.पहिल्या दोन तासात रेठरेहरणाक्ष गटात ८.५३ टक्के मतदान झाले. बोरगाव गटात ९.२९, कासेगाव गटात ९.४५, वाटेगाव गटात ७.४१, पेठ गटात ८.५७, वाळवा गटात १२.३६, कामेरी गटात ९.७४, चिकुर्डे गटात ९.४0, बावची गटात ९.४१, बागणी गटात ४.६२, तर येलूर गटात १२.२४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या वेळेत २४ हजार ८८४ मतदारांनी मताचा हक्क बजावला. त्यानंतरच्या २ तासात मतदानाची हीच टक्केवारी २२.0७ इतकी होती. ११.३0 वाजेपर्यंत ३६ हजार ८२७ पुरुष, तर २३ हजार ३८८ महिला मतदारांनी मतदान केले होते.दुपारच्या टप्प्यात उन्हाचा ताव वाढल्याने मतदान केद्रांवर मतदारांची उपस्थिती रोडावली होती. दुपारी ४ नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. शेवटच्या दीड तासात राष्ट्रवादी काँग्रेस व रयत विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न चालवले होते. शेवटच्या दोन तासात अंदाजे १५ टक्क्यांची वाढ होऊन एकूण मतदान ६७.४६ टक्क्यापर्यंत पोहोचले. ९७ हजार ४९२ पुरूष, तर ८६ हजार ५८६ महिला मतदारांनी मतदान केले.रेठरेहरणाक्ष गटात ९४.९६ टक्के मतदान झाले. बोरगाव गटात ६१.७३, कासेगाव गटात ७०.२०, वाटेगाव गटात ६४.३९, पेठ गटात ६७.०३, वाळवा गटात ७४.०४, कामेरी गटात ६४.९७, चिकुर्डे गटात ६८.३९, बावची गटात ७२.७८, बागणी गटात ६८.६३, येलूर गटात ६८.१५ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. (वार्ताहर)