शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

दुहेरी खून अनैतिक संबंधातून

By admin | Updated: June 10, 2014 02:12 IST

अखेर छडा : चुलत दिराला कर्नाटकातील जंगलात अटक; खुनाची कबुली

अखेर छडा : चुलत दिराला कर्नाटकातील जंगलात अटक; खुनाची कबुली शेगाव : अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या दरीबडची (ता. जत) येथील दुहेरी खून अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत खुनाचे कारण व संशयितास अटक करण्यात यश आले आहे. हा खून मृत अनिता कुन्नूर हिचा दीर चिदानंद हणमंत कुन्नूर (वय २७, रा. तिकोटा, ता. विजापूर) याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला सावळगी (ता. अथणी) येथील जंगलातून अटक करण्यात आली आहे. त्याने हातोड्याने घाव घालून अनिता व तिची मुलगी वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली आहे. येथील वनविभागाच्या हद्दीत विवाहितेसह तिच्या चार वर्षाच्या मुलीचा चार दिवसांपूर्वी खून केल्याचे उघडकीस आले होते. तब्बल चार दिवसानंतर मृतदेहांची ओळख पटल्यानंतर तपासाला गती मिळाली होती. अनिताचा पती मड्याप्पा हा द्राक्ष पॅकिंगचा व्यवसाय करतो. व्यवसायानिमित्त तो चार-पाच महिने बाहेर असायचा. या काळात अनिताचे तिचा चुलत दीर चिदानंदशी अनैतिक संबंध जुळून आले. चिदानंद ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. जानेवारी महिन्यात या दोघांनी पलायन केले. अनिताने सोबत वैष्णवीला नेले होते. तीन आठवडे ते कोल्हापुरात राहिले होते. त्यानंतर तो अनिताला घेऊन तिकोटाला आला. नातेवाईकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांंनी गावातील पंचांकडे तक्रार केली होती. पंचांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटविले होते. त्यानंतर या दोघांनी पुन्हा गावातून पलायन केले. ते कोल्हापुरात आश्रयाला गेले. या काळात चिदानंदला दारुचे व्यसन लागले. दारुच्या नशेत तो अनिताचा शारीरिक व मानसिक छळ करु लागला. यामुळे अनिता त्याच्याकडे गावी जाण्यासाठी तगादा लाऊ लागली. गावाकडे नाही नेलेस, तर तुझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देईन, अशी धमकी देत होती. यामुळे गेल्या आठवड्यात तो अनिता व वैष्णवीला घेऊन गावाकडे परत येण्यास निघाला. गुरुवारी रात्री त्यांनी गुड्डापूर (ता. जत) येथे मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी देवदर्शन करुन ते गावाकडे जाण्यास निघाले होते. दरीबडची येथे चिदानंदने अतिमद्य प्राशन केले. याठिकाणीच रस्त्यावर पंक्चर काढण्यासाठी उभारलेल्या ट्रॅक्टरमधून त्याने हातोडा घेतला. जंगलात गेल्यानंतर ते जेवणासाठी थांबले. जेवण झाल्यानंतर अनिताने पुन्हा गावाकडे कधी जायचे, अशी विचारणा केली. यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात त्याने अतिनाच्या डोक्यात हातोडा घातला. हा प्रकार पाहून वैष्णवी पुढे आली. त्यावेळी त्याने तिच्याही डोक्यात हातोडा घातला. दोघी मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने पलायन केले. (वार्ताहर)