शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

वाळवा-शिराळ्यात राजकीय हवा नरम

By admin | Updated: January 21, 2016 00:25 IST

नेतेही गारठले : सत्ताधारी, विरोधी गट शांत

अशोक पाटील -- इस्लामपूर राज्यात सत्ता नसल्याने वाळवा-शिराळ्यातील आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व मानसिंगराव नाईक, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची हवा नरम आहे. दुसरीकडे राज्यात सत्ता असूनही मंत्रिपदाच्या कुंपणावर असलेले आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपने ताटकळत ठेवल्याने, ऐन थंडीत या नेत्यांसह कार्यकर्तेही गारठले आहेत.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हे जयंत पाटील गटाचे आहेत. यापूर्वी कासेगावच्या देवराज पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. आता कोणत्या तालुक्याला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामेरीचे राष्ट्रवादीचे सदस्य रणजित पाटील उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. माजी आमदार विलासराव शिंदे आष्टा पालिकेच्या राजकारणात व्यस्त आहेत. वाळवा तालुक्यात पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक गटाचे राजकारण महत्त्वाचे मानले जाते. परंतु अलीकडील काळात त्यांच्या गोटातही शांतता दिसत आहे. प्रत्येकवेळी त्यांची राजकीय भूमिका बदलत असल्याने कार्यकर्त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शिक्षण संस्था, सूतगिरणी आणि चौंडी येथील प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. मध्यंतरी धनगर समाजाच्या प्रश्नावर आवाज उठविण्यात आघाडीवर राहिलेले डांगे सध्या थंड आहेत.हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी वाळवा तालुक्यातील राजकारण बाजूला करून, उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आता धरणग्रस्तांच्या प्रश्नाला हात घातला आहे. वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनीही या आंदोलनात मुसंडी मारली आहे.कामेरीचे जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांनी इतरत्र लक्ष न देता बँकेवरच लक्ष ठेवले आहे, तर त्यांचे चिरंजीव जयराज पाटील व्यवसाय सांभाळत राजकारणात बस्तान बसविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक विश्वास साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि उसाला चांगला दर यात गुंतले आहेत. याव्यतिरिक्त विरोधी आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद संपविण्यासाठी शिवाजीराव देशमुख व सत्यजित देशमुख गटाच्या हातात हात देऊन ताकद वाढविण्याच्या तयारीत आहेत.निवडणुका नाहीत : म्हणून वातावरणही नाहीसातारा-सांगली जिल्ह्यातून स्थानिक स्वराज संस्थेमधून निवडून द्यायच्या आमदारपदाची निवडणूक सोडली, तर नजीकच्या काळात कोणत्याच लक्षवेधी निवडणुका नाहीत. त्यामुळे सध्या जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर ते नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील, असे चित्र आहे. ते सध्या लग्नाचे मुहूर्त आणि दु:खद घटनेच्या ठिकाणी भेटी देण्यात व्यस्त आहेत.