शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चिंब उत्साहात कोरडी रंगपंचमी

By admin | Updated: March 29, 2016 00:28 IST

मनसोक्त रंगांची उधळण : सांगलीच्या तरुणाईने ठेवले दुष्काळाचे भान

सांगली : उन्हाचा चढत चाललेला पारा आणि त्यासोबतीला रंगांची अपार उधळण करत सोमवारी शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महाविद्यालय परिसरात तरुण-तरुणींचा मोठा उत्साह दिसून येत होता. दरम्यान, जिल्ह्यासह शहरात असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात बहुतांश ठिकाणी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. होळीनंतर आठवडाभरातच आलेल्या रंगपंचमीला दोनवेळा रंगांची उधळण करण्याची संधी शहरवासीयांना मिळाली. आपल्याकडे होळीला रंग खेळला जात नसल्याने सर्वांना रंगपंचमीची प्रतीक्षा होती. सकाळपासूनच शहरात रंगपंचमीला सुरुवात झाली. यंदा रंगांच्या उधळणीबरोबर पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यात आला असला तरी कोरड्या रंगांची अक्षरश: पोती घेऊन तरुण रस्त्यावर फिरताना दिसत होते. परिचिताला गाठून त्याला रंगात न्हावू घालण्यात येत होते. रंगांच्या उधळणीबरोबरच शहरातून मोटारसायकलवरून रपेट मारत अनेकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. मात्र, पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केल्याने मर्यादित स्वरुपात तरुणांनी हुल्लडबाजी केली. शहरात रंगपंचमीचा खरा उत्साह महाविद्यालय परिसरात दिसून आला. शहरातील सर्वच महाविद्यालयांचे रस्ते अक्षरश: रंगाने माखून गेले होते. रंगांची उधळण करण्यात मुलीही आघाडीवर होत्या. युवतींचे अनेक गटही वाहनांवरून रंगांची उधळण करीत फिरताना दिसत होते. दुपारनंतर रस्ते ओस पडले असले तरी सायंकाळी पुन्हा रंगांच्या उधळणीला जोर आला होता. (प्रतिनिधी)नैसर्गिक रंगांच्या वापराला प्राधान्य यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अनेकांनी कोरडी रंगपंचमी साजरी केली. त्यातही रासायनिक रंगांपासून डोळे आणि शरीराला होणारे अपाय लक्षात घेता रासायनिक रंगांचा वापर टाळण्यात आला होता. दरवर्षी आॅईल पेंटचाही वापर होत असे. मात्र, यंदा याचा वापर झाला नाही. याऐवजी पावडर रंग आणि त्यातही बाजारात उपलब्ध असलेले नैसर्गिक रंग वापरण्याला प्राधान्य देण्यात आले होते. ंसांगल्ांीच्या अनेक भागात पाणीपुरवठा बंदपाण्याची संभाव्य नासाडी टाळण्यासाठी महापालिकेने सोमवारी अनोखे पाऊल उचलले. शहराच्या गावठाणासहीत अनेक विस्तारित भागातील पाणीपुरवठा सकाळपासून बंद ठेवला. सायंकाळी चारनंतर त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे रंगपंचमीनिमित्त पाण्यात तसेच ओल्या रंगात चिंब न्हाऊन जाण्याच्या अनेकांच्या इच्छेवर पाणी पडले.