शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिगरबाज शेतकऱ्यांमुळे पाणीच पाणी

By admin | Updated: May 10, 2016 02:30 IST

६२ लाखांचे बिल भरले : आटपाडीकरांचे एक पाऊल पुढेच; तलाव भरणार

अविनाश बाड- आटपाडी --उपसासिंचन योजनांच्या भरमसाट बिलांमुळे अवाच्या सवा दराने आकारलेली पाणीपट्टी शेतकऱ्यांना भरणे कठीण होती. त्यामुळे या योजना बंद पडण्याची भीती निर्माण झालेली असताना, आटपाडी तालुक्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी आजअखेर टेंभू योजनेच्या पाण्यासाठी तब्बल ६१ लाख ४ हजार ८२८ रुपये भरले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील ७ तलाव आणि या तलावांना जोडणाऱ्या ओढ्यांतून १७४.४२ द.ल.घ.फूट एवढे कृष्णामाईचे पाणी ऐन उन्हाळ्यात मिळणार आहे. सध्या आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव पाण्याविना कोरडे पडू लागले आहेत. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या आटपाडी तलावातील पाणीही संपत आल्याने गाळमिश्रित पाणी पुरवठा केला जात आहे. शुक्रवार दि. ६ पासून टेंभू योजनेचे पाणी कामथ तलावातून ओढ्याने आटपाडी तलावात सोडले जात आहे. त्यामुळे आटपाडी तलावातील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. हे पाणी येण्यापूर्वी तलावात केवळ १५ द.ल.घ.फूट एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला होता. या तलावामध्ये २७.१९ द.ल.घ.फूट एवढा मृत पाणी साठा होता. म्हणजे हे पाणी गाळातील न वापरण्यासारखे आहे. पण अशा पाण्यावर आटपाडीकर तहान भागवत आहेत. शनिवारी तलावात २५ द.ल. घ.फूट एवढा पाणी साठा झाल्याने पाटबंधारे विभागाने परवानाधारक ३० शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीने तोडलेली विजेची कनेक्शन्स जोडण्यासाठी वीज कंपनीला पत्र दिले आहे. या सर्व शेतकऱ्यांना पाणी उपसा करताना मीटर बसविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे पाण्याची बचत तर होणारच आहे, पण त्याचबरोबर पाणी समस्या उद्भवणार नसल्याचेही तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.सध्या आटपाडी आणि कचरेवस्ती तलावात टेंभूचे पाणी सोडले आहे. या तलावात सध्या ५०.६२ द.ल.घ.फूट एवढा पाणी साठा आहे. निंबवडे तलावात पाणी सोडण्यासाठी माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी शनिवारी १३ लाख रूपये धनादेशाने भरले आहेत. त्यामुळे निंबवडे तलावात येताना पारेकरवाडी ते निंबवडे तलावापर्यंत ओढ्याने पाणी सोड्यात येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.