शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नेवरीतील बंधाऱ्याचे स्वप्न अद्याप अपुरेच

By admin | Updated: August 29, 2014 23:11 IST

तीनवेळा पूजन : शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी

गणेश पवार - नेवरी  --नेवरी (ता. कडेगाव) येथील येरळाकाठावरील महादेव मंदिराजवळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे आतापर्यंत दोन ते तीनवेळा पूजन झाले आहे. अद्याप त्या ठिकाणी बंधाऱ्याचे काम सुरू नसल्याने शेतकऱ्यांचे या नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे स्वप्न अद्याप अपुऱ्या अवस्थेत राहिले आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांचे स्वप्न अपुरेच राहिले आहे.येरळा नदीवरील महादेव मंदिराजवळ शासकीय अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी होऊनही बरीच वर्षे लोटली. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना काम पूर्ण होणार असल्याचे गाजर दाखविण्यात आले. याठिकाणी मातब्बर नेत्यांनी प्रत्यक्ष वाजत गाजत येऊन श्रीफळ वाढवून बंधाऱ्याचा प्रारंभ केला. गेल्या दहा वर्षांपूर्वी महादेव मंदिराजवळील या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांसाठी हा एक फार्स झाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी बऱ्याचदा संबंधित अधिकाऱ्यांकडे या बंधाऱ्याची चौकशी केली असता, निधी उपलब्ध नसल्याबाबत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बरीच वर्षे लोटली असतानाही या शेतकऱ्यांनी ताकारी योजनेच्या पाण्यावर स्वत:च्या खर्चातून मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी पाईपलाईन केल्या आहेत. विविध बॅँकांतून कर्जे घेऊन शेतीमध्ये ऊस लागवडी केल्या आहेत. या बंधाऱ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असून अजून अधिक क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. मात्र प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे महादेव मंदिराजवळील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे नशीब कधी उघडणार, अशी चर्चा शेतकऱ्यांतून केली जात आहे. या ठिकाणी बंधाऱ्याचे काम न झाल्याने वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे. हा बंधारा नेवरीतील शेतकऱ्यांसाठी एक चर्चेचा विषय बनला असून हा बंधारा होणार की नाही, याकडे लक्ष वेधले आहे. येरळाकाठावरील तुपेवाडी, येतगाव, भिकवडी खुर्द, विठ्ठलनगर, ननवरे मळा याही भागातील शेतकऱ्यांना कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. संबंधित खात्याने वेळीच लक्ष देऊन निधी उपलब्ध करून या बंधाऱ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.