शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढा

By admin | Updated: November 2, 2016 00:00 IST

भारत पाटणकर : बलवडी (भा.) येथे बळिराजा धरणाचा वर्धापन दिन कार्यक्रम

आळसंद : राज्यातील एकूण लोकसंख्येनुसार मराठा समाजाची लोकसंख्या सहा कोटी इतकी आहे. मात्र, मराठा समाज आजही विकासापासून वंचित व मागासलेला आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती असल्याने सरकारने मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. बलवडी (भा.) तांदळगाव (ता. खानापूर) येथील येरळा नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या बळिराजा धरणाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी सरपंच मनीषा दुपटे, मोहनराव कदम, अ‍ॅड. कृष्णा पाटील, डॉ. प्रशांत पन्हाळकर, अनिल पाटील, विलास चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. पाटणकर म्हणाले, राज्यातील युती शासनाला दोन वर्षे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राज्यातील शेतकऱ्यांना पाणी देणे अवघड आहे. हे विधान फडणवीस यांनी मागे घ्यावे. २५ एप्रिलला झालेल्या बैठकीत सर्वांना समन्यायी पाणी वाटप पध्दतीने पाणी देता येईल. गेल्या वीस वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून पाण्यासाठी लढा सुरू आहे. त्याला आता यश आले आहे. टेंभू, ताकारी योजनेचे वीज बिल शासनाने १०० टक्के भरावे, दुष्काळी भागातील लोक उंचावर राहिले आहे. हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवाल करत सध्या ८० टक्के वीज बिल शासन, तर २० टक्के वीजबिलबाबत लवकरच जनसुनावणी होणार आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करावा. बळिराजा धरण पात्रातील गाळ काढण्यासाठी किमान १५ दिवस पात्र कोरडे ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. तरच नदीपात्र स्वच्छ करता येणे शक्य असल्याचे डॉ. पाटणकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी अ‍ॅड. कृष्णा पाटील, विलास पाटील, आनंदराव पाटील, देवकुमार दुपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मच्छिंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास माजी सरपंच रघुनाथ पवार, पांडुरंग चव्हाण, विक्रम चव्हाण, हसिना मुल्ला, सुरेश चव्हाण, विश्वास दुपटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) अग्रणी बारमाही : काम चुकीच्या पध्दतीने खानापूर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या अग्रणी नदी बारमाही करण्याचे काम चुकीच्या पध्दतीने झालेले आहे. नदीपात्रातील गाळ काढून बाजूला टाकला होता. तो गाळ पावसाने पुन्हा नदीपात्रात आला आहे. त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे. मराठवाड्यातील मांजरा नदीचेही काम अशा चुकीच्या पध्दतीने झाल्याचा आरोप डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना केला.