इस्लामपूर येथे शिवसेनेच्यावतीने सागर मलगुंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी सतीश पाटील, योगेश हुबाले, संग्राम साळुुंखे, राजू पठाण, राजेंद्र पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने थकीत वीज बिलासाठी तगादा लावू नये, तसेच वीज बिलांची वसुली करताना सक्ती करू नये. अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी दिला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मलगुंडे यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. त्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या काळात सगळ्याचेच आर्थिक चक्र ठप्प झालेले आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून थकीत वीज बिलासाठी तगादा लावला जात आहे. महावितरणने ग्राहकांवर अन्याय न करता त्यांच्याकडे उपलब्ध असलेली रक्कम भरून घेऊन आणि उर्वरित बिलाचे हप्ते करून द्यावेत, असे स्पष्ट केले आहे.
यावेळी सतीश पाटील, राहुल टिबे, संग्राम साळुंखे, राजू पठाण, राजेंद्र पाटील, प्रितम काळे, योगेश हुबाले, अतुल सूर्यवंशी, दीपक पाटील, आदित्य पवार, विशाल शिंदे, सुहास पेठकर उपस्थित होते.