कुपवाड : शहरातील विश्वजितेश फौंडेशनच्यावतीने रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना व शहरातील इतर गरजूंना मोफत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी डी. युवा शक्तीचे संस्थापक विनायक रूपनर म्हणाले की, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना व गोरगरीब गरजूंना जेवण मिळण्यात येत असलेली अडचण लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून अखंंडितपणे सुरू आहे.
या उपक्रमासाठी अश्विन मुळके, सचिन गडदे, अभिजित हुलवान, संदेश हाके, पंकज सावंत, नीलेश माने, अरुण कदम, नीलेश येडगे, राजू सय्यद, नितीन पवार आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
फोटो ओळ : सांगलीत विश्वजितेश फौंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या मोफत अन्नदानाच्या उपक्रमामध्ये डॉ. जितेश कदम यांच्याहस्ते गरजूंना जेवणाचे वाटप करण्यात आले. यावेळी विनायक रूपनर, अश्विन मुळके, सचिन गडदे, अभिजित हुलवान, संदेश हाके उपस्थित होते.