सांगली : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांगली विभागाच्यावतीने रविवारी ५ सप्टेंबरला ‘डाॅक्टर आपल्या दारी’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्षा डॉ. माधवी पटवर्धन यांनी दिली.
रविवारी ५ सप्टेेंबरला सकाळी ११ वाजता वेबिनार होणार आहे. यामध्ये ‘स्तनपान अमृतासमान’ या विषयावर डॉ. वसुधा जोशी यांचे, ‘मुलांसाठी पौष्टिक आहार’ या विषयावर डॉ. स्वप्नील मिरजकर, ‘आला पावसाळा, तब्येत सांभाळा’ या विषयावर डॉ. अमित तगारे, ‘कोरोना आणि लहान मुलांची दक्षता’ या विषयावर डॉ. केतन गद्रे मार्गदर्शन करणार आहेत. लहान मुलांबाबतच्या विविध प्रश्नांवर, विकारांवर तज्ज्ञांकडून माहिती मिळणार असून, चॅटबॉक्समध्ये सहभागी लोकांना प्रश्नही विचारता येणार आहेत. या वेबिनारमध्ये लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पटवर्धन व असोसिएशनचे सचिव डॉ. सुहास जोशी यांनी केले आहे.