मिरज : मिरजेतील बांधकाम व्यावसायिक संतोष आरवट्टगी यांची दोन कोटी रुपये फसवणूक केल्याप्रकरणी डाॅ. सुयोग ऊर्फ बाबू सॅम्युअल आरवट्टगी (रा. गोवा) यांना गांधी चाैक पोलिसांनी गोव्यातून अटक केली.
संतोष आरवट्टगी यांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या काकू डाॅ. सरोजनी सॅम्युअल आरवट्टगी (रा. मिरज), चुलतभाऊ डाॅ. विजय सॅम्युअल आरवट्टगी (रा. विश्रामबाग सांगली) व डाॅ. सुयोग ऊर्फ बाबू सॅम्युअल आरवट्टगी (रा. गोवा) यांच्यासोबत मिरजेतील गांधी चौकातील तीस गुंठे जागेचा विकसन करार करून तिघांना दोन कोटी पाच लाख रुपये दिले होते. मात्र, नंतर तिघांनी विकसनासाठी जागेचा कब्जा देण्यास नकार देत संतोष यांना दमदाटी केल्याची तक्रार आहे. याबाबत संतोष आरवट्टीगी यांनी मिरज न्यायालयात फसवणुकीची फिर्याद दिली. न्यायालयाच्या आदेशाने गांधी चौक पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन डाॅ. सुयोग आरवट्टगी यांना गोव्यातून अटक केली. न्यायालयाने डाॅ. सुयोग आरवट्टगी यांची जामिनावर सुटका केली असून अन्य दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.