शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

इंदुतार्इंचे शोषितांसाठीचे कार्य न विसरण्याजोगे : आ. ह. साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:39 IST

कासेगाव : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांनी शेतमजूर, धरणग्रस्त, दीनदलित व शोषित वर्गासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.कासेगाव (ता. वाळवा) येथील थोर स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या प्रथम सुमूर्ती दिनानिमित्त शनिवारी कॉ. नजुबाई गावित यांना ‘क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर सुमूर्ती’ पुरस्कार प्रदान ...

ठळक मुद्दे कासेगावमध्ये नजुबाई गावित यांना ‘क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर स्मृती’ पुरस्कार प्रदान

कासेगाव : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांनी शेतमजूर, धरणग्रस्त, दीनदलित व शोषित वर्गासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.कासेगाव (ता. वाळवा) येथील थोर स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या प्रथम सुमूर्ती दिनानिमित्त शनिवारी कॉ. नजुबाई गावित यांना ‘क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर सुमूर्ती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. भारत पाटणकर, विजय घोगरे आदी उपस्थित होते.

कॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, या कार्यक्रमाचा अध्यक्ष करून एकाअर्थाने माझाच सन्मान केल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, देशात सध्या अनेक बाबींबाबत वेगवेगळे मतप्रवाह बनत आहेत. त्यामुळे वातावरण बिघडत आहे. याचा तरुणांनी विचार केला पाहिजे.कॉ. नजुबाई गावित म्हणाल्या की, ज्यावेळी मला हा पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी मला खूप आनंद झाला. कारण इंदुताई यांनी आयुष्यभर त्याग केला आहे. त्यांच्या याच त्यागाने मी भारावून गेले आहे. या पुरस्काराने मला आणखी मोठे बळ मिळाले असून येथून पुढेही माझे काम मी करतच राहणार आहे.यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुमेध माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.उपेक्षित घटकांना न्यायासाठी संघर्षआ. ह. साळुंखे म्हणाले की, इंदुतार्इंनी आपल्या कार्याने या भागाचे नाव मोठे केले. बाबूजींच्या निधनानंतरही त्यांनी मोठ्या धाडसाने आपल्या मुलाला सामाजिक चळवळीत पुढे आणले. त्यांनी आपल्या जीवनात खरोखरच क्रांती केली असून अनेक उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. डॉ. भारत पाटणकरांनी त्यांचा लढा मोठ्या ताकदीने सुरू ठेवला आहे.कासेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारी नजुबाई गावित यांना ‘इंदुताई पाटणकर स्मृती’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याहस्ते देण्यात आला. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. भारत पाटणकर उपस्थित होते.