शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा, निवडणुका पुढे ढकला : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:05 IST

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा : राजू शेट्टी निवडणुका पुढे ढकला : सांगलीतील पत्रकार परिषदेत मागणी

सांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुऱ्हाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे.

पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढासांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुºहाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे.

विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे. पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangli Floodसांगली पूर