शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस येईपर्यंत गावांची वीज तोडू नका-: शिवाजीराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:37 IST

शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन ...

ठळक मुद्देशिराळा येथे ऊर्जामित्र बैठकीत महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी सूचना आ. शिवाजीराव नाईक यांनी येथील तहसील कार्यालयात ऊर्जामित्र बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.

आ. नाईक म्हणाले, सध्या तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी क ोणत्याही परिस्थितीत गावाच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये. शासनाने सौरऊर्जेवर पाणी पंप वापरावेत असे सांगितले असले तरी, नदीकाठच्या शेतकºयांना याबाबत सक्ती करु नये. नदीकाठाला पावसाळ्यात नदीचे पाणी पात्राबाहेर येते. काहीवेळा पूरपरिस्थिती उद्भवते. त्यामुळे सौरऊर्जा युनिट बसविणे शेतकºयांना अडचणीचे व नुकसानकारक आहे. या बाबींची दखल घेऊन नदीकाठी शिथिलता द्यावी.

यावेळी कार्यकारी अभियंता रजनीकांत साखरे, उपअभियंता पी. एम. बुचडे, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, विजय पाटील, सागर पाटील, उपकार्यकारी अभियंता आर. बी. सूर्यवंशी, आर. बी. कसबे, ए. आर. कोरे, आर. एम. शेळके, पी. के. भिलवडे, अमर पाटील, आर. वाय. माने, धीरज वाघ, एम. एच. रसाळ, नगरसेवक बंडा डांगे, सौ. सीमा कदम उपस्थित होते.अडचणी सोडविल्या...वीज बिल, पाणी उपसा पंप, कनेक्शन व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक आणि इतर शेकडो वीज ग्राहकांच्या अडचणी या बैठकीत सोडविण्यात आल्या.शिराळा येथील ऊर्जामित्र बैठकीत आमदार शिवाजीराव नाईक यांनी वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक केली.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण