शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus-सांगलीतील दिव्यांग शिंदे दांपत्य कोरोनातून सहीसलामत बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 16:53 IST

Corona virus Divyang Sangli : पुण्यातल्या रस्त्यांवर कंदील घेऊन निघालेल्या अंधाची गोष्ट बरीच प्रसिद्ध आहे. मी नेत्रहीन असलो तरी कंदीलामुळे इतरांना माझ्या अस्तित्वाची जाणिव व्हावी असा हेतू असल्याचे या अंधाचे स्पष्टीकरण होते. सांगली यशवंतनगरमधील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या आनंदा लक्ष्मण शिंदे (वय ७३ ) यांनीही कोरोनामध्ये अशीच प्रेरणादायी भूमिका बजावली.

ठळक मुद्देसांगलीतील दिव्यांग शिंदे दांपत्य बनले परस्परांचा प्राणवायू, कोरोनातून सहीसलामत बाहे

संतोष भिसेसांगली : पुण्यातल्या रस्त्यांवर कंदील घेऊन निघालेल्या अंधाची गोष्ट बरीच प्रसिद्ध आहे. मी नेत्रहीन असलो तरी कंदीलामुळे इतरांना माझ्या अस्तित्वाची जाणिव व्हावी असा हेतू असल्याचे या अंधाचे स्पष्टीकरण होते. सांगली यशवंतनगरमधील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या आनंदा लक्ष्मण शिंदे (वय ७३ ) यांनीही कोरोनामध्ये अशीच प्रेरणादायी भूमिका बजावली.शिंदे कोरोनाबाधित झाले, पण अंधपणामुळे इतरांपासून संपर्क टाळणे शंभर टक्के शक्य नव्हते. अजाणतेपेणी कोणीतरी संपर्कात यायचे. हे लक्षात घेऊन शेजाऱ्यापाजाऱ्यांना स्पष्टपणे कोरोनाबाधेची माहिती दिली. लपवून ठेवण्याने संसर्ग फैलावून अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत, अशा काळात शिंदे यांनी स्वत:च इतरांना सावध केले.

गेली चाळीस वर्षे शिंदे कुटूंब यशवंतनगरमध्ये राहते. वसंतदादा कारखान्यातील ३६ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच देवीमुळे दृष्टीही गेली आहे. सध्या मधुमेहदेखील आहे. पत्नी रंजना (वय ६७) जन्मत:च दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत.११ मे रोजी दोघेही कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचा रिपोर्ट आला. उघड्या डोळ्यांनी कोरोनाचा हाहाकार पाहणारे बाधित होताच हादरुन जातात, पण दृष्टी नसल्याने या हाहाकारापासून अज्ञानी असलेल्या शिंदे दांपत्याने सकारात्मक भावनेने कोरोना स्वीकारला. स्वत:पासून अंतर राखण्याची विनंती नातेवाईकांना व शेजाऱ्यांना केली. डॉक्टरांच्या सूचनांनुसार घरातच उपचार सुरु झाले. मुलगा संजय व सून वासंती देखभाल करायचे, पण दुर्दैवाने तेदेखील बाधित झाले.अशावेळी मदतीसाठी मित्र धावले. दैनंदिन वस्तू घरपोच दिल्या. माहेश्वरी युवा मंचानेही हात दिला. यादरम्यान मुलगा व सून कोरोनामुक्त झाले. शिंदे दांपत्यानेही मात केली.परस्परांना दिला विश्वासदिव्यांग शिंदे दांपत्याने परस्परांना विश्वास देत प्रकृती स्थिर ठेवली. अ‍ौषधयोजना, आहार, आरोग्यदायी जीवनशैलीचे डॉक्टरांच्या सूचनांनुसार काटेकोर पालन केले. महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास हरवू दिला नाही. त्यामुळे दोन आठवड्यांच्या विलगीकरण काळात त्यांचा ऑक्सिजन स्थिर राहिला. दिव्यांगपणामुळे त्यांचे संपूर्ण सहजीवनच एकमेकांच्या मदतीने सुरु होते, कोरोनाकाळातही हातातला हात सुटू दिला नाही. हा विश्वास परस्परांचा प्राणवायू ठरला. कोरोनाने माघार घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDivyangदिव्यांगSangliसांगली