शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

जिल्ह्यास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले

By admin | Updated: June 6, 2015 00:54 IST

शेतकऱ्यांत समाधान : ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित, शेतांमध्ये साचले पाणी, घरांवरील पत्रे उडाल्याने साहित्याचे नुकसान

सांगली : गुरुवारी रात्री उशिरा व शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार वळीव पाऊस झाला. सांगली शहरासह वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्याने अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाला होता. कुंडल, दुधोंडी येथील काही नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे १ तास पाऊस पडत होता. यामुळे शहर व परिसरातील नाले पाण्याने स्वच्छ धुऊन निघाले. सखल भागात पाणी तसेच साचून राहिले होते. कुरळप, कामेरी, पेठ, इटकरे, येलूर, तांदुळवाडी, नेर्ले, कासेगाव, वाळवा, बहे, भवानीनगर, बिचूद, रेठरेहरणाक्ष, ताकारी, शिरटे, येडेमच्छिंद्र येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली. गोटखिंडी : गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने गोटखिंडी, बावची परिसराला झोडपून काढले. दोन तास झालेल्या पावसाने वीजपुरवठाही खंडित झाला होता.कडेगाव : कडेगाव तालुक्यात गुरुवारी रात्री कडेगाव, वांगी, कडेपूर, चिंचणी, देवराष्ट्रे परिसराला रात्री ११ ते १२ च्या दरम्यान पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होता, तर कडेगाव, शाळगाव, विहापूर, शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कडेगाव बाजारामध्ये विक्रेते, ग्राहकांची तारांबळ उडाली. देवराष्ट्रे : गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास अंबक, आसद, मोहिते वडगाव, चिंचणी, पाडळी, वाजेगाव, सोनकिरे, शिरसगाव या भागात प्रथमच दमदार हजेरी लावली. शेतातील पिकांसह केळी, डाळिंब व भाजीपाला यांची प्रचंड हानी झाली आहे. वांगी : शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून तालुक्यातील देवराष्ट्रे, वांगी, कडेगाव, शाळगाव, नेवरी परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दमदार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून शेतातील ताली भरल्या आहेत. पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होतापलूस : पलूस शहर आणि परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस रात्रभर संततधार सुरू होता. रात्री ९ नंतर पावसाने झोडपून काढले. कवठेमहांकाळ : वादळी वारा आणि पावसाने कवठेमहांकाळ तालुक्याला गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले. अनेक गावातील ओढ्यांना पाणी आले आहे. कवठेमहांकाळ, कुची, ढालगाव, रांजणी, हिंगणगाव, जाधववाडी, झुरेवाडी, खरशिंग, बोरगाव, मळणगाव, कोंगनोळी, करोली परिसरात पाऊस झाला.देशिंग : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे गारांचा वर्षाव झाला. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सोळा तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.कुंडल : कुंडल परिसरात गुरुवारी रात्री ११ च्या दरम्यान जोरदार वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. कराड-तासगाव रस्त्यावर माळी वस्ती ते घाडगे पूलदरम्यान झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. भाळवणी : भाळवणी, कळंबी, ढवळेश्वर, शेळकबाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले व पडझड झाली. विटा, पारे, बामणी, चिंचणी (मं), आळसंद या परिसरात जोरदार पाऊस पडला. शिराळा : शिराळ्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारासही चांदोली, कोकरूड, चरण, आरळा, मांगले, शिरसी, वाकुर्डे, अंत्री खुर्द येथे दमदार पाऊस झाला. सागाव : शिराळा तालुक्यातील सागाव, कणदूर, पुणवत, नाटोली, कांदे परिसरात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी सहानंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. (वार्ताहर)