शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

जिल्ह्यात दुबार खरीप पेरणीचे संकट कायम

By admin | Updated: July 9, 2015 23:41 IST

दमदार पावसाची प्रतीक्षा : कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागात पिके कोमेजू लागली; शेतकरी चिंतेत

सोनी : मिरज तालुक्यातील सोनीसह परिसरातील पिके पावसाअभावी वाळू लागली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाबरोबरच हंगामही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणी केलेल्या पिकांना ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्याची सोय आहे, ते पाणी पाजत आहेत. पण सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात फटका बसत आहे. गावातील व्यवहारही मंदावले आहेत. सोनीसह परिसरातील भोसे, पाटगाव, करोली (एम) परिसरात जूनच्या मध्यंतरी दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी ९० टक्के पेरणी पूर्ण केली आहे. पेरणीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी दमदार पिकाची आशा व्यक्त केली होती. पण पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवली आहे. शेतातील पिके आता पाण्याअभावी करपू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, कूपनलिका आहेत, ते पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पावसाच्या अभावामुळे गावातील व्यवहारावरही परिणाम झाला असून व्यवहार मंदावल्याचे व्यापारी सांगत आहेत. पावसाने दोन दिवसात हजेरी लावली तरच पिकांना जीवदान मिळण्याची आशा आहे. अन्यथा शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. देशिंग : कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग परिसरासह बनेवाडी, मोरगाव, हरोली, अलकूड येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या. पण पुन्हा पावसाने दडी मारल्याने जमिनीतून वर आलेले पिकांचे कोंब वाळू लागले आहेत.देशिंग परिसरात ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु वरुणराजाने सतत हुलकावणी देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. येथील शेतकऱ्यांनी ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, विविध प्रकारची कडधान्ये आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणीही बंद असल्याने पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. इथली बऱ्यापैकी शेती पावसावर अवलंबून आहे, तर देशिंग परिसरात द्राक्ष व ऊसशेती मोठ्या प्रमाणावर असल्याने, या शेतीला पाणी द्यायचे, की खरीप हंगामातील पिकांना पाणी द्यायचे, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.येळापूर : जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या शिराळा तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाणार असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. दोन दिवसात पावसाने सुरुवात केली नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.तालुक्यात खरीप हंगामातील जवळपास ९0 टक्के पेरण्या झाल्या असून या हंगामामध्ये धूळवाफेने पेरलेल्या भाताबरोबरच मका, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड आदी पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील बहुतांशी जमीन डोंगरउतारावर असून पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होतो. तसेच खडकाळ माळरानाची जमीन असल्यामुळे शेतात पाणी टिकून राहत नाही. त्यामुळे उंचावरील असणाऱ्या पिकांना पाणी कमी प्रमाणात मिळत असते. सध्या खरीप हंगामातील सर्व पिकांची चांगल्या पध्दतीने उगवण झाली आहे. मात्र पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार का? पुन्हा पेरणी केली, तर त्याची योग्य प्रमाणात उगवण होणार का? असाही प्रश्न आहे. पावसाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. (वार्ताहर)कवठेमहांकाळ घाटमाथ्यावर चिंतेचे ढगघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे या पट्ट्यामध्ये अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्राच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या किरकोळ सरीवर बळीराजाने मोठ्या धाडसाने पेरण्या केल्या. पण त्यानंतर गेले आठ दिवस झाले, पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पेरण्या झालेल्या व उगवून आलेल्या रोपांना आता खरी पावसाची गरज आहे. गेले आठ दिवस पावसाने पाठ फिरवली आहे. कडक ऊन्हामुळे उगवून आलेल्या कोंबांवर परिणाम होत आहे. रांजणीत शेतकरी हवालदिलकवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड एस., कोकळे भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जूनमध्ये मान्सून सक्रिय झाल्यावर या भागातील शेतकऱ्यांना खरिपाच्या मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मटकी, मका अशी पेरणी केली. पण मोठ्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.