शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ७७.३ टक्के जादा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:47 IST

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ...

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे. वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यात तर दुपटीने पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सप्टेंबर २०१८ मध्ये जिल्ह्यात सरासरी ३२९.८ मिलिमीटर पाऊस झाला. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे तिथे तीन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती; तर पशुधनासाठी शासनाला चारा छावण्या सुरू केल्या होत्या. यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये गतवर्षीपेक्षा आणखी बिकट परिस्थिती निर्माण होईल, असेच जिल्ह्यात चित्र होते. जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. तोपर्यंत दि. २४ जुलैपासून राज्यभर संततधार पावसाने हजेरी लावली. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार झाला होता. दि. ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७८.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत २४८.६ मिलिमीटर जादा पाऊस झाला. टक्केवारीचा विचार केल्यास, ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे.दुष्काळी भागात जोराचा नसला तरी, रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपाची पिके शेतकºयांच्या कशी तरी पदरात पडतील, अशीच परिस्थिती आहे. मिरज तालुक्यात ५९.७ टक्के, जत ४८ टक्के, खानापूर ४१.९ टक्के, वाळवा १०८.१, तासगाव १००.६, शिराळा ४१.६, आटपाडी १११.७, कवठेमहांकाळ ८५.४, पलूस ९० आणि कडेगाव तालुक्यात ८९.५ टक्के जादा पाऊस यावर्षी जादा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)तालुका २०१९ २०१८मिरज ५११.२ ३२४.७जत २६४.५ १४४.६खानापूर ३०१.४ २६२.६वाळवा ७५८.४ ३३६.७तासगाव ४४६.७ १४९.८शिराळा १४४३ ११५४.६आटपाडी २४१.१ ५३.७कवठेमहांकाळ ३६७.१ १६२.४पलूस ५०९.२ २४२कडेगाव ५५५.६ ३१४.६एकूण ५७८.४ ३२९.८