शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जि. प. सभापतींच्या निवडी ६ एप्रिलला

By admin | Updated: March 24, 2017 23:47 IST

विशेष सभा बोलाविली : रयत विकास आघाडी, भाजप, स्वाभिमानी आघाडीला प्रतिनिधीत्व

सांगली : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतींच्या निवडी दि. ६ एप्रिल रोजी होणार आहेत. यासाठी नूतन सदस्यांची विशेष सभाही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी बोलाविली आहे. दरम्यान, भाजप, रयत विकास आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या सदस्यांना प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक इच्छुकाने सभापतीपद पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. सभापतिपदाबरोबरच बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती पदावर अनेकांचा डोळा आहे.जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेत भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेचे सुहास बाबर यांना उपाध्यक्ष पदाची लॉटरी लागली आहे. रयत विकास आघाडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट (स्वाभिमानी विकास आघाडी) यांना सभापती पदाचे बक्षीस दिले जाणार आहे. भाजपमधील खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर या गटालाही सभापतीपदे देण्यात येणार आहेत. रयत विकास आघाडीकडून वाळवा गटातील प्रा. डॉ. सुषमा नायकवडी आणि पेठ गटातील जगन्नाथ माळी, घोरपडे गटाकडून संगीता नलवडे (देशिंग, ता. कवठेमहांकाळ), आशा पाटील (रांजणी, ता. कवठेमहांकाळ) यापैकी एकाला सभापती पदाची संधी मिळणार आहे.रयत विकास आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे सत्तेवर आले आहे. पण, भाजपकडेही २५ सदस्यांची संख्या असल्यामुळे येथील बरेचजण इच्छुक आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असली तरी, सर्व तालुक्यांचा समतोल साधत प्रत्येकाला संधी द्यावी लागणार आहे. भाजपच्या पंचवीस सदस्यांमध्ये आ. विलासराव जगताप यांचे सहा, तर खासदार संजयकाका पाटील व आ. सुरेश खाडे गटाचे मिरज तालुक्यात सात सदस्य निवडून आले आहेत. जगताप व खाडे यांनी काँग्रेसला जोरदार शह देत सदस्य निवडून आणले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या प्रत्येकी एकाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार आहे. जगताप गटाकडून सरदार पाटील (दरीबडची), तमनगौडा रवी (जाडरबोबलाद) आणि स्नेहलता जाधव (शेगाव) यांची नावे चर्चेत आहेत.आ. खाडे यांच्या मतदारसंघातून अरुण राजमाने (मालगाव), शिवाजी डोंगरे (कवलापूर) आणि शोभा कांबळे (हरिपूर) यांच्या नावांची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर गटालाही आटपाडी तालुक्यातून संधी मिळण्याची शक्यता आहे. ६ एप्रिल रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडी होणार आहेत. आता या पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडेही साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडीवेळीही राजकीय मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)बांधकाम समितीसाठी इच्छुकांमध्ये स्पर्धाजिल्हा परिषद बांधकाम समितीसाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा आहे. उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी बांधकाम व आरोग्य समितीवर दावा सांगितला आहे. याशिवाय, कृषी व पशुसंवर्धन, अर्थ व शिक्षण, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण अशा चार समिती सभापतींच्या निवडी दि. ६ एप्रिल रोजी होणार आहेत. बांधकाम नाही मिळाले, तर शिक्षण व अर्थ या महत्त्वाच्या समित्या भाजपच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे. उर्वरित समित्या मित्रपक्ष व संघटनांना भाजप देण्याच्या तयारीत आहे. विषय समिती सभापतींच्या निवडीसाठीही भाजप आणि अन्य संघटनांची बैठक होणार असून, यामध्येही सभापतींची नावे निश्चित होणार आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगला अनुभव घेतल्यामुळे समिती सभापतींची निवडणूक ते लढविण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसत आहे.