शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

जिल्ह्याला हस्ताच्या पावसाने झोडपले

By admin | Updated: October 2, 2015 23:47 IST

रब्बीच्या आशा पल्लवित : शहरातील सखल भागात पाणी; विद्युत पुरवठा खंडित

सांगली : पूर्वभाग वगळता सांगली-मिरज शहरांसह जिल्ह्याला मुसळधार पावसाने शुक्रवारी सायंकाळी झोडपून काढले. दुष्काळी जत तालुक्यात मात्र तुरळक पाऊस झाला. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्युतपुरवठा खंडित झाल्याने अनेक भागात अंधार पसरला होता. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने, रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. सुमारे तीन तास सरी कोसळत होत्या. सांगली शहरात शिवाजी पुतळा, मंडई, सिटी पोस्ट परिसरात पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. मिरजेत सखल भागात पाणी साचले होते. विद्युत तारा तुटून पडल्याने शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला. पावसामुळे मिरज पूर्वभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बेडग, आरग, नरवाड, म्हैसाळ, सोनी, भोसे, सलगरे, लिंगनूर, खटाव, कळंबी, मालगाव, एरंडोली, टाकळी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. विट्यासह खानापूर तालुक्याच्या काही भागात मध्यम, तर रात्री आठच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. खानापूर पूर्वभागातही पाऊस झाला. आळसंद, भाळवणी, ढवळेश्वर, कळंबी परिसरात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. माहुली, लेंगरे, नागेवाडी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विटा शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास दहा ते पंधरा मिनिटे पावसाने हजेरी लावली. कडेगाव, कडेपूर, तडसर, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव परिसरासही पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी ओढे-नाले भरून वाहिले. खांबाळे पाटी (ता. कडेगाव) येथील सुर्ली ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने दुपारी चार ते सहापर्यंत विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील कऱ्हाड-विटा वाहतूक ठप्प होती. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, करगणी परिसरात सातच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. तासगाव शहरासह कवठेएकंद, मणेराजुरी परिसरास दोन ते तीन तास पावसाने झोडपून काढले. पूर्वभागातील सावळज, वायफळेतही जोरदार पाऊस झाला. शिराळा, वाळवा तालुक्यांत संततधार गेल्या दोन दिवसांपासून इस्लामपूर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी तुरळक हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी संपूर्ण वाळवा तालुक्यात संततधार धरली. रात्री आठपर्यंत हा पाऊस बरसत राहिला. पावसामुळे सोयाबीनची मळणी करणारा शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. जत शहर आणि परिसरात दुपारी दोनच्या दरम्यान तुरळक प्रमाणात पाऊस झाला. शिराळा तालुक्यात शिराळासह सागाव, मांगले, शिरशी, कोकरूड, पुनवत परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. अनेक ठिकाणी भात काढणी बंद करावी लागली. कवठेमहांकाळ तालुक्यात रात्री सातच्या सुमारास अर्धा तास विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुची, करोली (टी), शिरढोण, देशिंग, हिंगणगाव, रांजणी, ढालगाव या परिसराला पावसाने झोडपले.