शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्हा बॅँकेची मोबाईल एटीएम बँकिंग सेवा

By admin | Updated: March 20, 2015 23:16 IST

शैलेश कोतमिरे : यात्रा-जत्रांमध्ये व्हॅन फिरणार

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी मोबाईल बँकिंग व मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून जिल्हाभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील यात्रांच्या ठिकाणी जाऊन तेथील ग्राहकांना पैसे उपलब्ध करून देणार आहे. हा उपक्रम राबविणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव बँक असल्याची माहिती प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ही सेवा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच सुरु होणार आहे.ते म्हणाले, प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यापासून बँक तोट्यातून बाहेर काढली आहे. माणगंगा, महांकाली, वसंतदादा साखर कारखान्यांच्या थकबाकीचा प्रश्न सुटला आहे. सध्या बँक एनपीएतून बाहेर पडली आहे. नाबार्डचे सर्व निकष पूर्ण करणारी बँक आहे. ७५ कोटींनी बँकेच्या ठेवी वाढल्या असून, २३३ कोटींचा स्वीय निधीही आहे. सध्या बँकेने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून मोबाईल बँकिंग व मोबाईल एटीएम व्हॅन ही बँकिंग सेवा सुरू केली आहे. एटीएमला बायोमेट्रिक स्कॅनर, इनबिल्ट कॅमेरा, आॅडिओसह मशीन आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच बँकेचे रूपे डेबीट कार्डचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर अन्य बँकेच्या खातेदारांनाही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये नियमित बँकेचे व्यवहार करणे सोपे होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तेथे नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)पहिल्या टप्यात येथे जाणार व्हॅनपहिल्या टप्प्यामध्ये वसगडे (ता. पलूस) शाखेच्या ब्रम्हनाळ येथे दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ आणि खटाव येथे दर सोमवारी दुपारी २. ३० ते ४. ३०, नरसिंगपूर (ता. वाळवा) या शाखेच्या कार्यक्षेत्रातील किल्लेमच्छिंद्रगड येथे दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १, कृष्णा कारखाना दर मंगळवारी दुपारी १. १५ ते २. ३०, शिरटे येथे दर मंगळवारी दु. ३ ते ४. ३०, आळसंद (ता. खानापूर), बलवडी (भा.) येथे दर बुधवारी सकाळी १० ते दुपारी १२. ३०, खंबाळे दर बुधवारी दु. १ ते २. ३०, वाझर येथे दर बुधवारी दु. ३ ते ४. ३०, सांगली येथे दर रविवारी आणि गुरुवारी व्हॅन असणार आहे.