शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

जिल्हा बँक निवडणूकपूर्व प्रक्रियेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 17:03 IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत प्रारूप मतदार यादीसाठी बॅँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२० पर्यंत संस्थांनी त्यांचे ठराव दोन प्रतींमध्ये तालुका उपनिबंधकांकडे द्यायचे असून, त्यानंतर मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणूकपूर्व प्रक्रियेस सुरुवातहे वर्ष जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गाजणार

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत प्रारूप मतदार यादीसाठी बॅँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२० पर्यंत संस्थांनी त्यांचे ठराव दोन प्रतींमध्ये तालुका उपनिबंधकांकडे द्यायचे असून, त्यानंतर मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल.एप्रिल किंवा मेमध्ये संचालक मंडळाची २०२० ते २०२५ या कालावधीसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात जिल्ह्यातील काही मोठ्या सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. यात जिल्हा बॅँकेसह सांगली अर्बन बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिक्षक बॅँक, सॅलरी अर्नर्स सोसायटी यांचा समावेश आहे. त्यामुळे हे वर्ष जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गाजणार आहे.

यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी जिल्हा बॅँकेच्या २०२० ते २०२५ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांना ठराव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जानेवारीअखेर यासाठी मुदत दिली आहे.त्यानंतर तालुका उपनिबंधकांकडून हे ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर होतील. त्यांच्याकडून ते बॅँकेला दिले जाणार असून बॅँक या ठरावांची छाननी करून यातील पात्र, अपात्र सभासद, मतदार निश्चित करणार आहे. त्यांची प्रारूप मतदार यादी जाहीर होईल. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी होऊन बॅँकेची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यानंतर १५ दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.जिल्हा मध्यवर्ती बॅँक ही जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची शिखर बॅँक आहे. यात विकास सोसायट्या, नागरी बॅँका, पतसंस्था, दूध संस्था, प्रक्रिया संस्था, सूतगिरणी, मजूर सोसायट्या यांच्यासह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या संचालक मंडळाच्या सभेत संस्थेच्यावतीने जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी एका सभासदाला अधिकार दिला जातो.याचा ठराव करून तसेच जिल्हा उपनिबंधकांना कळवावे लागते. हे ठराव एकत्रित करून त्या त्या गटातील मतदार सभासदांची मतदार यादी तयार केली जाते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सर्व गटातील सभासद मतदान करतात.मागील पंचवार्षिक निवडणूक ६ मे १९१५ रोजी झाली होती. त्यामुळे यावेळी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली