शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

माळवाडीप्रकरणी जिल्हाभर आंदोलने

By admin | Updated: January 10, 2017 23:18 IST

सांगलीत मोटारसायकल रॅली : आंदोलनकर्ते-पोलिसांत वादावादी; १३ कार्यकर्ते ताब्यात

सांगली : माळवाडी-भिलवडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या जिल्हा ‘बंद’मध्ये सांगलीत निषेध फेरी काढताना कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर वादावादी झाली. पोलिसांनी १३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. माळवाडीतील घटनेनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, निषेध मोर्चे निघाले. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी जिल्हा ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. त्याला सांगली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, राहुल पाटील, राहुल जाधव, अजय देशमुख, रवी खराडे, रणजित पाटील, अंकीत पाटील, श्रीकांत शिंदे, प्रशांत भोसले, आशा पाटील, अ‍ॅड. तेजस्विनी सूर्यवंशी, पूनम पाटील, प्रिया गोटखिंडे, कविता बोंद्रे, अमृता बोंद्रे, दुर्गा यादव, उषा पाटील यांनी शहरातील विविध मार्गावरुन फिरुन बंदचे आवाहन केले. विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक, राममंदिर चौक व सिव्हिल चौकात बंदचे आवाहन करताना वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यावेळी त्यांचा पोलिसांशी किरकोळ वाद झाला. राम मंदिर चौक, सिव्हिल चौक, काँग्रेस भवन, आझाद चौक, राजवाडा चौक, कापड पेठ, तानाजी चौक, कर्नाळ रस्ता, बालाजी चौक, हरभट रस्ता शिवाजी मंडई, मुख्य बसस्थानक परिसर, आंबेडकर रस्ता, विश्रामबाग, शंभरफुटी रस्ता, स्फूर्ती चौक या मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. याचवेळी महिला शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. सायंकाळनंतर व्यवहार सुरळीत सुरु झाले. (प्रतिनिधी)बंद : यशस्वीजिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच आजचा बंद शांततेच पार पाडला. पोलिसांना सर्वप्रकारचे सहकार्य केले. काही ठिकाणी बंद करण्यावरुन पोलिसांशी किरकोळ वाद झाला, पण तेथेच मिटला. जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. आष्ट्यात कडकडीत बंदआष्टा : आरोपीला तातडीने अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा, त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आष्टा येथे बंद आंदोलनादरम्यान करण्यात आली. शहरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद शांततेत पार पडला. सर्वपक्ष्ीाय नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. आंदोलनात वैभव शिंदे, विराज शिंदे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, नितीन झंवर, डॉ. सतीश बापट, पोपट भानुसे, रघुनाथ जाधव, शैलेश सावंत, अमोल घबक, विनय कांबळे, संग्राम जाधव, सतीश कुलकर्णी, उदय कुशिरे, अनिल पाटील, संदीप गायकवाड, प्रभाकर जाधव, विजय मोरे, दीपक थोटे, गुंडा मस्के, शहाजी डोंगरे, नंदकुमार बसुगडे, सुनील माने, दादा शेळके, सतीश माळी, नियाजुल नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते जत शहरात मूक मोर्चाजत/शेगाव : जत शहरात बंद पाळून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. जत वाचनालय चौक, गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, संभाजी चौक ते शिवाजी पेठ मार्गे प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात मच्छिंद्र बाबर, मोहन माने-पाटील, विजय ताड, अनिल शिंदे, संग्राम राजेशिर्के, प्रशांत चव्हाण, कैलास गायकवाड, प्रदीप नागणे, संदीप शिंदे, योगेश शिंदे, डॉ. महेश भोसले, प्रमोद चव्हाण यांनी केले. आंदोलनात शिवसेनेचे विजयराजे चव्हाण, गौतम ऐवळे, विक्रम ढोणे, भूपेंद्र कांबळे, बाळासाहेब जाधव, मदन भोसले, प्रमोद चव्हाण, नगरसेवक महादेव कोळी, मुन्ना पखाली, पापा कुंभार, महांतेश सक्रिमठ सहभागी झाले होते. आटपाडीत निषेध मोर्चाआटपाडी : माळवाडी (ता. पलूस) येथील घटनेच्या निषेधार्थ आटपाडी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी बंदला आटपाडी तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला. आटपाडी बसस्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिक संघटनेसह विविध संस्था व संघटनांनी आंदोनास पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेतला. या मोर्चात महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. सरपंच स्वाती सागर, सदस्या उषा पाटील, उपसभापती भागवत माळी, मराठा आरक्षण समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष विनायक पाटील, हणमंतराव देशमुख, बापूसाहेब गिड्डे, स्नेहजित पोतदार, प्रा. व्ही. एन. देशमुख, संताजी देशमुख, विजय देशमुख, महेश देशमुख, किरण मिसाळ, विकास पाटील, अरुण बालटे, विजय देवकर, शिवराज पाटील, श्रेयस पाटील, ऋषिकेश देशमुख, प्रा. विजय शिंदे, उपसरपंच संतोष पुजारी, निळूकाका देशपांडे, मोहन देशमुख यांनी मोर्चात सहभाग घेतला. पीडित शाळकरी मुलीला श्रध्दांजली वाहून आंदोलनाची सांगता झाली. (वार्ताहर)