शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शून्य रुपयाचे वीजबिल झाले दुरूस्त-ग्राहकाला वितरित : तांत्रिक चूक झाल्याचा महावितरणचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:12 IST

सांगली : सांगली तील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिला त महावितरण कडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोजी संबंधित वीज ग्राहकास बिलाची पावती पोहोच केली.तांत्रिक कारणांमुळे शून्य ...

सांगली : सांगलीतील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिलामहावितरणकडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोजी संबंधित वीज ग्राहकास बिलाची पावती पोहोच केली.तांत्रिक कारणांमुळे शून्य रुपयाच्या वीज बिलास १० रुपये दंड आणि विलंब आकार लागल्याचा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

राहुल वारद हे महावितरणच्या विश्रामबाग (सांगली) उपविभागाचे वाणिज्य ग्राहक आहेत. मागील सहा महिन्यांपासून वारद त्यांचे बिल आगाऊ भरत आहेत. त्यामुळे त्यांना येणारे वीज बिल वजा रकमेचे येत होते. मे महिन्यात त्यांना ९९ युनिटच्या वीज वापरापोटी १२२२.२६ रुपये इतके वीजबिल आकारण्यात आले. परंतु वारद यांची १२२३.०८ रुपये रक्कम महावितरणकडे शिल्लक होती. त्यामुळे वीज देय रक्कम शून्य आली.चालू महिन्याचे वीजबिल व महावितरणकडे ग्राहकाची असलेली शिल्लक/आगाऊ रक्कम यात एक रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यामुळे देयक रक्कम शून्य आली आहे.दंडही झाला शून्यतांत्रिक चुकीमुळे त्याठिकाणी १० रुपये दाखविण्यात आली. त्याची दुरूस्ती सुधारित बिलामध्ये करण्यात आली असून, ग्राहकाला नव्याने सुपूर्द केलेल्या वीज बिलावर सर्व रकमा शून्य करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने यंत्रणेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल