कुपवाड : समाजोपयोगी कामामध्ये अग्रेसर असलेले डॉ. स्वप्नील चोपडे व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने येथील वृद्ध सेवाश्रमामध्ये पन्नास वाफेच्या मशीन्सचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सध्याच्या काळात वृद्धांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना असोसिएशनच्या वतीने उपयोगी असलेल्या वाफेच्या मशीन्स देण्याचे ठरवले होते. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या मशीन्सचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. चोपडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, माजी आमदार शरद पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रामदास हजारे, सदस्य डॉ. अनिल पाटील, डॉ. सचिन उदगावे, डॉ. गणेश चौगुले, डॉ. संदीप पाटील व डॉ. प्रियांका लवटे उपस्थित होते.
फोटो-२८कुपवाड१
फोटो ओळ : कुपवाड वृद्ध सेवाश्रमामध्ये मशीन्सचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. स्वप्नील चोपडे, प्रा. शरद पाटील, डॉ. रामदास हजारे, डॉ. संदीप पाटील, डॉ. गणेश चौगुले उपस्थित होते.