आष्टा येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व निशिकांत दादा युथ फाऊंडेशनतर्फे गोरगरिबांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रवीण माने, वीर कुदळे, पांडुरंग बसुगडे, प्रमोद डांगे, काशिनाथ ढोले, शोएब सनदे उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरात गरजू लोकांना निशिकांतदादा युथ फाऊंडेशन व निशिकांतदादा मदत केंद्र यांच्यातर्फे धान्य वाटप करण्यात आले. आष्टा पालिकेतील विरोधी पक्षनेते वीर कुदळे, पांडुरंग बसुगडे, प्रमोद डांगे, काशीनाथ ढोले यांच्या हस्ते गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व निशिकांतदादा युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण माने, जैनुद्दीन तांबोळी, अविनाश काळोखे, उमेश रासकर, आरबाज मुजावर, भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया आष्टा शहराध्यक्ष रविराज चव्हाण, शोएब सनदे, तौसिफ शेख, अनिकेत खोत, प्रदीप सिध्द, ऋतिक जगदाळे, पृथ्वीराज चव्हाण, अल्ताफ कुलकर्णी उपस्थित होते.