सांगली : सांगलीच्या स्टेशन रोडवरील दक्षिण बाजूस असलेल्या गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वहात राजवाडा परिसरापर्यंत जात आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
याच परिसरात उत्तर बाजूस असलेल्या गटारीत बीएसएनएल कार्यालयाने झाडांच्या फांद्या व कचरा टाकला होता. तो हटविण्याच्या सूचना साखळकर यांनी दिल्या. त्यानंतर गटार प्रवाहीत झाली, मात्र स्टेशन रोडवरील ड्रेनेज दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही.