शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

वसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:36 IST

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायनाची मुदत दोन महिन्यात संपणार असून वाढीव मुदतीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी, यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसहकार सेनेने, अवसायन प्रक्रियेस मुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्र्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देवसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वादमुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायनाची मुदत दोन महिन्यात संपणार असून वाढीव मुदतीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी, यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसहकार सेनेने, अवसायन प्रक्रियेस मुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्र्यांकडे केली आहे.नियमबाह्य कर्जवाटप, संचालकांचा मनमानी कारभार, इमारतींवर केलेला अवाढव्य खर्च, राजकारण्यांना दिलेली बेकायदेशीर कर्जे यामुळे बॅँकेचा तोटा वाढत गेला आणि बॅँक बंद पडली. बॅँकेच्या सांगलीसह राज्यात ३६ शाखा होत्या. बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणे मुश्किल झाले.

याबाबतच्या तक्रारींनंतर रिझर्व्ह बँकेने तत्कालीन सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांच्या अहवालानंतर २६ जून २००८ रोजी रिझर्व्ह बॅँकेने बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात ७ जानेवारी २००९ रोजी या बँकेचा बॅँकिंग परवाना रिझर्व्ह बॅँकेने रद्द केला व १६ फेब्रुवारी २00९ रोजी बॅँकेवर अवसायक मंडळ आले. अवसायनाचा हा कालावधी १0 वर्षांचा होता. तो १६ फेब्रुवारी २0१९ रोजी संपल्यानंतर अवसायनाची मुदत वर्षाने वाढविण्यात आली. आता ही मुदत फेब्रुवारी २0२0 मध्ये संपुष्टात येणार आहे.वसंतदादा बँकेच्या अवसायनाची मुदत संपुष्टात येऊन पुन्हा मुदतवाढ मिळू नये, म्हणून डाव आखला गेल्याची तक्रार शिवसहकार सेनेने शासनाकडे केली आहे. या संघटनेचे जिल्हा संघटक प्रदीप बर्गे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अवसायन प्रक्रियेस पुन्हा मुदतवाढ मिळू नये म्हणून तत्कालीन संचालक, बुडवे कर्जदार, काही वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत.

सध्याचे अवसायक निळकंठ करे यांनी बँकेच्या मालमत्तेचा लिलाव लावलेला आहे. तो बेकायदेशीर आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता, सुमारे १६0 कोटी रुपयांची कर्ज वसुली होऊन, चौकशी सुरू असलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणांतील २४७ कोटी वसूल होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली