शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बरखास्तच करा

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

शरद पाटील : हद्दवाढीस जनता दलाचा विरोध; कुपवाडचा विकास ठप्पच

सांगली : महापालिका स्थापन होऊन १७ वर्षांचा कालावधी लोटला तरी, अद्याप कुपवाड, वानलेसवाडीचा कोणताही विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे नव्या गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यास आमचा विरोध आहे. याउलट ही महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, महापालिकेच्या बहुसंख्य वस्त्या अजूनही अविकसित आहेत. कुपवाड व वानलेसवाडी या दोन्ही गावांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक रस्ते अद्याप खराब आहेत. सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था नाही. पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. याठिकाणच्या शाळा अजूनही जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जातात. कुपवाड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय गेली पाच वर्षे अपूर्ण अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत माधवनगर, धामणी, अंकली, हरिपूर या गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामागचा उद्देश कळालेला नाही. सध्याच्या महापालिका क्षेत्रातच सुविधा न देऊ शकणाऱ्या या संस्थेने अन्य गावांच्या समावेशाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू नये. संबंधित गावांच्या संमतीशिवाय महापालिकेने याबाबत कोणतेही पाऊल उचलू नये. महाआघाडीच्या कारभारावर लोकांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्याकडून अपेक्षाभंग झालेला आहे. त्यामुळे ही पालिकाच बरखास्त करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यासाठी चळवळही उभारण्यात येईल. (प्रतिनिधी)कर्नाटकसारखी भूमिका हवीमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावांच्या प्रश्नाबाबत शरद पाटील म्हणाले की, कर्नाटकातील सीमाभागातील काही गावांनी ज्यावेळी पाणी व अन्य सुविधांसाठी महाराष्ट्रात येण्याचा इशारा दिला होता, त्यावेळी कर्नाटक सरकारने तातडीने अडीचशे कोटी रुपये मंजूर करून या गावांतील सर्व प्रश्न सोडविले होते. ही गावे आता सुविधांबाबत सक्षम आहेत. महाराष्ट्र सरकारनेही या गावांची भावना समजून घेऊन तातडीने त्यांच्यासाठी निधीची तरतूद करून सुविधा पुरविल्या पाहिजेत. या गावांतील लोकांशी आम्ही प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहोत. त्यांच्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू. शेतकऱ्यांच्या पेन्शनप्रश्नी जनता दलाच्यावतीने २८ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.