शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसेल तर पंचायत समितीच बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली. सभागृहाने तसा ठरावही मंजूर केला.येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली. सभागृहाने तसा ठरावही मंजूर केला.येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात सभापती सचिन हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती नेताजी पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र खरात, सुहास बुधवले यांच्या उपस्थितीत सोमवारी सभा झाली.शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामुळे विकास कामांसाठीचा निधी थेट ग्रामपंचायतींकडे जातो. पंचायत समिती सदस्यांना विकास कामासाठी निधी मिळत नाही. सदस्यांना निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी पेठेच्या वसुधा दाभोळे यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यावर महाडिक यांनी, विकास कामांसाठी जर निधी मिळणारच नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली.सत्ताधारी राष्ट्रवादीचे गटनेते देवराज पाटील यांनी, ठिबकसाठीच्या अनुदानाची रक्कम वाढवावी, अशी मागणी केली. तोही ठराव सभागृहाने मंजूर केला.अ‍ॅड. विजय खरात यांनी, शिधापत्रिकेसाठी हेलपाटे मारावे लागतात. तहसील कार्यालयात तोंड बघून कामे केली जातात, असे आरोप केले.शंकर चव्हाण यांनी, तहान लागल्यावर विहीर खोदायची, असले काम बंद करा, अशा शब्दात अधिकाºयांना फटकारले. पिण्याच्या पाण्याचा आठ दिवस पुरवठा होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.अभियंता कोरे यांनी, कामाची सर्व तयारी आहे, मात्र पैसेच नाहीत. पूर्वी या विभागाकडे २५ लोक होते. आता सातजण आहेत. त्यामुळे काय करणार? अशी वस्तुस्थिती मांडली. योजनेच्या परिस्थितीचे अहवाल वेळोवेळी दिले जातात का? या प्रश्नावर चव्हाण यांनी पंचायत समितीमधील अधिकाºयांकडे विचारणा केल्यावर त्यांनी, असे अहवाल आमच्याकडे येत नाहीत असे सांगितले.यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आॅक्टोबरपासून पाणीटंचाई जाणवेल. त्यामुळे त्याचे नियोजन करा, अशी मागणी केली.एसटीच्या आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पाटील यांनी, एसटीच्या सर्व फेºया वेळेवर निघून वेळेत पोहोचल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यातूनही काही तक्रार अथवा सूचना असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.राहुल महाडिक यांनी तालुक्यातील पीक परिस्थितीची विचारणा केल्यावर, पीक परिस्थिती चांगली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पी. टी. पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. देवराज पाटील यांनी, ठिबकसाठी अनुदानाची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली.ग्रामपंचायत विभागाचा सावळागोंधळआनंदराव पाटील यांनी, ग्रामपंचायतीकडील वसुली आणि थकबाकीची माहिती दिली जात नाही, असा आरोप केला. ग्रामपंचायतीकडे अपुरा निधी असतानाही कामांचे प्रस्ताव केले जातात. ती कामे अर्धवट राहतात. त्यामुळे त्याचा वापरही होत नाही. निधीच्या प्रमाणातच कामे करावीत, अशीही सूचना त्यांनी केली.च्धनश्री माने, आनंदराव पाटील यांनी, पश्चिम भागाच्या गावातील तलावात पाणीसाठा नाही. शेखरवाडीसह परिसराच्या तलावातील पाणी दूषित आहे. त्यावर उपाययोजना करा, अशी मागणी केली.अभियंता दिनकर पाटील यांनी, कोणतीही विकासकामे पूर्ण स्वरुपात व्हावयाची असतील, तर आर्थिक नियोजन लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करावेत, असे स्पष्ट केले.