वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. फक्त अत्यावश्यक सेवा व सकाळी अकरा वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला ही दुकाने सुरू राहणार असे शासनाने आदेश जारी केले आहेत. मात्र, काही व्यापारी आदेशाचे पालन न करता दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समितीची नेमणूक केली आहे. त्या समितीने गावात होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ढालगावमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीने फिरून व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. सर्वांनी शासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा या समितीने दिला आहे.
यावेळी उपसरपंच माधवराव देसाई, सरपंच प्रतिनिधी जनार्दन देसाई, ग्रामसेवक डी. एस. जोशी, गावकामगार तलाठी के. एस. सयाम, पोलीस पाटील माणिक पाटील, अभिजित मायने, कृषी सहायक बी. एस. शिंदे, जालिंदर मलमे, एस. डी. मोहिते, एस. बी. चव्हाण उपस्थित होते.