शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीविरोधात सर्वपक्षीयांची गट्टी भाजपमध्ये मतभेद : स्थगितीसाठी लागली मोठी ताकद

By अविनाश कोळी | Updated: February 27, 2023 20:06 IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराविरोधात झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू असताना त्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली गेली आहे.

सांगलीजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराविरोधात झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू असताना त्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली गेली आहे. त्यामुळे स्थगितीसाठी ताकद लागली आहे. भाजपचेच नेते गोपीचंद पडळकर यांच्या मागणीवरून मागील सरकारने स्थगिती दिलेल्या चौकशीला पुन्हा सुरुवात झाली होती, मात्र भाजपच्याच स्थानिक नेत्यांना पडळकरांचा हा पवित्रा आवडला नाही. त्यामुळे यावरून भाजप अंतर्गत छुपा संघर्ष आहे.

स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने जिल्हा बँकेची चौकशी लावली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार चालतो. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या काळात चौकशीचे आदेश निघाल्याने राज्यभर खळबळ निर्माण झाली होती. नंतर काही संचालकांनी चौकशीला विरोध केल्यानंतर स्थगिती देण्यात आली.जिल्हा बँकेत मागील काही वर्षांपासून सर्वच पक्षांचे संयुक्त पॅनेल सत्तेत आहे. मागील संचालक मंडळात सत्तास्थानी राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना व काँग्रेसचे काही नेते होते. ज्या कामांबाबत तक्रारी होत चौकशीची मागणी झाली त्या कामाला संचालक मंडळाची मंजुरी आहे. कारवाईचा निर्णय झाल्यास राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे भाजपच्या काळात जरी जिल्हा बँकेच्या चौकशीला सुरुवात झाली असली तरी हा निर्णय म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ असाच आहे.

पडळकर यांचा जिल्हा बँकेशी कधीही संबंध आला नाही. त्यांचा कोणीही निकटवर्तीय नातेवाईक जिल्हा बँकेतील कर्जदार नाही. याशिवाय जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांशी त्यांची फार जवळीक नाही. त्यांचे संबंध थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या मतांचा फारसा विचार ते करीत नाहीत. त्यामुळेच त्यांनी जिल्हा बँकेच्या चौकशीची आग्रही मागणी केली. त्यांचे ‘टार्गेट’ जयंत पाटील असले तरी जयंतरावांच्या नेतृत्वातील पॅनेलमध्ये भाजपचे नेतेही होते, याचा विसर पडळकरांना पडला किंवा त्यांनी त्याची फिकीर केली नाही. त्यामुळे चौकशीला सुरुवात झाली.

ही तर सर्वपक्षीय इच्छा...

जिल्हा बँकेच्या चौकशीला स्थगिती मिळावी, ही तर सर्वपक्षीय इच्छा आहे. त्यामुळे शासनाच्या एका विभागातून व मंत्र्यांकडून चौकशी थांबविण्याचे तोंडी आदेश आल्याचे सांगण्यात येते. आता स्थगिती मिळावी म्हणून ताकद लावली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगली