शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून आता थेट बांधकाम परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:50 IST

सांगली : महापालिकेकडून २०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवाना देण्याचा अधिकार आता वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार आहेत. शिवाय आर्किटेक्ट व इतरांची जबाबदारी मात्र वाढली आहे. नकाशापेक्षा जादा बांधकाम झाल्यास आर्किटेक्ट, अभियंत्यासह जागा मालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

ठळक मुद्देमहापालिकेकडून आता थेट बांधकाम परवानानागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार

सांगली : महापालिकेकडून २०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवाना देण्याचा अधिकार आता वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार आहेत. शिवाय आर्किटेक्ट व इतरांची जबाबदारी मात्र वाढली आहे. नकाशापेक्षा जादा बांधकाम झाल्यास आर्किटेक्ट, अभियंत्यासह जागा मालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.राज्य शासनाने २२ आॅगस्ट २०१७ रोजीच यासंदर्भात अध्यादेश काढला होता. २०० चौरस मीटरपर्यंतची बांधकामे आर्किटेक्टच्या परवान्यावर सुरू करता येतील. पण या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सव्वादोन वर्षाचा कालावधी गेला.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी इंजिनिअर, बिल्डर व आर्किटेक्ट यांच्याशी चर्चा करून, अखेर या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आता आर्किटेक्ट, व्यावसायिक अभियंते व सुपरवायझर हे २०० चौ.मी.पर्यंतचे बांधकाम सुरू करू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची यादी, स्वयंम् प्रमाणपत्र, मालक व आर्किटेक्ट यांचे हमीपत्र, बांधकामाचा नकाशा महापालिकेकडे सादर करावा लागणार आहे.

बांधकामापोटी विकास शुल्कासह इतर कराचाही भरणा करावा लागेल. या निर्णयामुळे बांधकाम परवान्यासाठी महिनो न् महिने वाट पाहावी लागणार नाही. महापालिकेकडे कागदपत्रे सादर केल्यानंतर थेट बांधकामाला सुरूवात करता येऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाकडील हेलपाटे वाचणार आहेत. शिवाय या विभागातील अर्थपूर्ण तडजोडीलाही चाप बसेल. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली