शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून दुष्काळावर मात करा--दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:00 IST

दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक-शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर नियोजन करावे

सांगली : दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, पुनर्वसन उपायुक्त दीपक नलावडे, पुरवठा उपायुक्त नीलिमा धायगुडे, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जत आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्यातील भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी समोर आल्या आहेत. त्या निवारण्यासाठी प्रशासनाने आता नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, त्या ठिकाणी जीपीएस कार्यप्रणालीचा काटेकोरपणे अवलंब होतो का नाही, याची पाहणी करावी. टँकर भरून घेण्यासाठीचे जलस्रोत निश्चित करण्यात यावीत. टॅँकरमधून पाणी पुरवठा करताना त्याठिकाणी ब्लिचिंग पावडरचा उपयोगही करणे बंधनकारक आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन केले असून सर्व सूचनांचे पालन होईल असे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

चारा छावण्यांसाठी सात प्रस्तावचारा छावण्यांसाठी सात प्रस्ताव आले असून पाच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तीन चारा छावण्या सुरू झाल्या आहेत, दोन चारा छावण्या लवकरच सुरू करण्यात येतील. अजून आटपाडी तालुक्यातून चार व जत तालुक्यातील चार चारा छावण्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावर मागणी व आवश्यकता लक्षात घेऊन चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अभिजित चौधरी, प्रताप जाधव, दीपक नलावडे, नीलिमा धायगुडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तSangliसांगली