शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांमध्ये मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:47 IST

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकास ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी विकास आघाडीत एकमत असताना, सांगली येथे भाजपच्या मुलाखतीवेळी मात्र इच्छुकांत मतभिन्नता दिसली. त्यामुळे अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे जाणवले.विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत भाजपच्या मुलाखतीवेळी इस्लामपूर मतदार संघातील इच्छुकांची गर्दी होती. मुलाखतीसाठी प्रथम नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील गेले. त्यानंतर विक्रम पाटील (इस्लामपूर), वैभव शिंदे (आष्टा), स्वरूप पाटील (शिगाव), भीमराव माने (कवठेपिरान) यांनी मुलाखत दिली. गौरव नायकवडी (वाळवा) स्वत: मुलाखतीसाठी गेले नाहीत, परंतु त्यांच्या समर्थकांनी पक्षनिरीक्षक संभाजीराव पाटील-निलंगेकर यांची भेट घेऊन, नायकवडी यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. येथील संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमराव माने, राहुल महाडिक, विक्रम पाटील, वैभव शिंदे यांनी एकत्रित जाऊन, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, असा प्रस्ताव ठेवला आहे. यातून भाजपमधील अंतर्गत संघर्ष नजरेस आला. भरीस भर म्हणून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना युतीतील रयत क्रांती आघाडीकडून उमेदवारी मिळावी, म्हणून त्यांचे पुत्र सागर खोत यांनी पक्षनिरीक्षकांकडे मागणी केली.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बळावर सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक, महाडिक युवाशक्ती आणि हुतात्मा गटाची ताकद एकवटल्याने सत्तांतर झाले.राष्ट्रवादीतून विकास आघाडीत आलेले निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले. त्यानंतर नगराध्यक्ष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील हे दोघेही मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व मानत असले तरी, इस्लामपूर मतदार संघात दोघांमधील दरी कायम आहे.नुकत्याच आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना मदत करताना इच्छुकांनी स्वत:चे आणि पक्षाचे मार्केटिंग केल्याचे दिसून आले.गौरव नायकवडी भाजपच्या वाटेवरइस्लामपूर मतदार संघात सहकारी क्षेत्रात हुतात्मा संकुलाचे वेगळे स्थान आहे. त्यामुळे भाजपमधून उमेदवारी मिळावी म्हणून ‘हुतात्मा’चे गौरव नायकवडी यांचे समर्थक सांगली येथे जाऊन निलंगेकर यांना भेटले आणि उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे नायकवडी भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.