शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

जिल्हा परिषदेसाठी आघाड्यांचे पेव फुटणार

By admin | Updated: August 14, 2016 00:31 IST

निवडणुकीची तयारी : भाजप, शिवसेनेची मोर्चेबांधणी, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी लागणार--लोकमत विशेष

अशोक डोंबाळे-- सांगली --जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह यावर्षी भाजप व शिवसेनेनेही कंबर कसली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून काहीही निर्णय झाला तरी खानापूर, आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील काही जागांवर आम्ही आघाडी करूनच निवडणूक लढविणार, अशी भूमिका घेऊन दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये मतदान होणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने तालुकानिहाय मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीनेही जत, आटपाडी, वाळवा येथे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. यंदा भाजपनेही जिल्हा परिषदेत कमळ फुलविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांची दोन दिवसांची कार्यशाळा गुड्डापूर (ता. जत) येथे नुकतीच झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आठवले गट यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. नेत्यांसमोर आव्हानकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडीचा निर्णय घेण्याआधीच स्थानिक नेत्यांनी राजकीय सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. या आघाड्यांचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. काही असले तरी, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात ठेवण्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे.खानापूर, आटपाडीत शिवसेना धनुष्यबाणाची चुणूक दाखविणार असून, त्यासाठी आमदार अनिल बाबर, तानाजी पाटील रणनीती आखत आहेत. परंतु, धनुष्यबाणाची धार बोथट करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक, काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांची खेळी सुरू आहे. याची झलक खरसुंडी (ता. आटपाडी) आणि भाळवणी (ता. खानापूर) येथील सोसायटी निवडणुकीत त्यांनी दाखविली आहे. जिल्हा पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर ठीक, नाही तर आमची खानापूर व आटपाडीत आघाडी असणारच, असे काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सांगत आहेत. मिरज तालुक्यातील पश्चिम भागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव आहे. कवठेपिरान आणि कसबे डिग्रज असे दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती मतदारसंघ येथे येतात. कवठेपिरानचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मिरज पूर्वभागात काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपच्या आ. सुरेश खाडे गटाशी सामना करावा लागणार आहे.शिराळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची आघाडी निश्चित असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. तेथे आमदार शिवाजीराव नाईक यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसचा नानासाहेब महाडिक गटही त्यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. वाळवा जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गण परत खेचून आणण्यासाठी क्रांती आघाडीचे नेते व हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचे प्रयत्न सुरू आहेत. तेथे या सर्वांना राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील गटाशी लढत द्यावी लागणार आहे.राष्ट्रवादीशी आघाडी नाही : मोहनराव कदमकाँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही. भाजप व शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पक्षाचे मेळावे झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दिली.राष्ट्रवादी स्वबळावरच : विलासराव शिंदेविधानसभा निवडणुका राष्ट्रवादीने स्वबळावर लढल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस व अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकाही घेणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली.जत तालुक्यातील निवडणूक लक्षवेधी होण्याची चिन्हे...जत तालुक्यातील निवडणूक मात्र लक्षवेधी होणार आहे. तेथे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि जनसुराज्य पक्ष अशी चौरंगी निवडणूक होणार आहे. जनसुराज्य पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांची मागील निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली होती. पण, सध्या ते राष्ट्रवादीपासून आणि भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्यापासूनही दूर आहेत. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजीवकुमार सावंत हे जरी सध्या राष्ट्रवादीत असले तरी ते आ. जगताप यांच्याबरोबर जाणार आहेत. काँग्रेसचे विक्रम सावंत, सुरेश शिंदे, पी. एम. पाटील, राष्ट्रवादीचे अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत.